पुणे येथील अश्वमेध फाउंडेशन च्या वतीने तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मोफत औषधोपचार व औषध वाटप.
प्रतिनिधी सारंग महाजन.
आषाढी वारी करता श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेला प्रस्थान झाले असून यावेळी मोठ्या संख्येने वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळाली हे वारकरीत टाळ मृदंगाच्या तालात तल्लीन होऊन पंढरीची वाट चालत आहे. आज पालखी हडपसर येथे आली असता अश्वमेध फाउंडेशनच्या वतीने अन्नासाहेब मगर फार्मसी कॉलेज यांच्या सोबत हडपसर येथे ‘तुकाराम महाराज पालखी’ सोहळ्यात मोफत आवश्यक औषधोपचार व औषधी वाटप करून, सेवा करण्यात आली. तेव्हा अश्वमेध फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रम जाधव (स्विकृतनगरसेवक-हडपसर) व सदस्य शत्रुघ्न मधुकर बाजड (सरपंच-वडजी) यांनी सेवेत सहकार्य केले.
“विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ.”
रामकृष्ण हरी
