वुई टू गेदर फाउंडेशनच्या वतीने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विध्यार्थ्यांना आर्थिक मदत
प्रतिनिधी: गोपाळ भालेराव
चिंचवड: आज दिनांक 22जून 2025 रोजी वुई टू गेदर फाउंडेशनच्या वतीने काही गरीब व गरजवंत विध्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात आली. समाजात आजही अनेक विद्यार्थी आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शिक्षणापासुन वंचित असल्याचे निदर्शनास येत आहे.
हिच परस्थिती ओळखून वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने श्यक्य तेवढ्या विद्यार्थ्यांना आर्थिक निधी देण्याचा प्रयत्न केला आहे.
म्हणूनच फाउंडेशनच्या वतीने आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहय्यता निधी उपक्रम चालू करण्यात आला.
काहींना आई नाही,काहींना वडील नाहीत,काहींना आई वडील दोघे नाहीत व काहींची आर्थिक स्थिती बिकट आहे असे विद्यार्थी शोधून त्यांना आर्थिक मदत करण्यात आली.
या उपक्रमास पदाधिकारी,सदस्य,यांच्यासह अनेक दानशूर व्यक्तींनी उदार मनाने मदत केली.
या उपक्रमाची सुरवात चिंचवड येथिल आनंदी बाई डोके सांकृतिक सभाग्रह येथे करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रतिभा कॉलेजचे मुख्य प्रशासक अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
हा उपक्रम अतिशय स्तुत्य निःस्वार्थी सेवा व आगळा वेगळा आहे वुई टुगेदर फाउंडेशन कायम असेच निःस्वार्थी उपक्रम राबवीत असते असे त्यांनी या कार्यक्रमाचे खूप कौतुक केले तसेच गरजू मुलांना श्यक्य ती मदत करण्याचा नक्की प्रयत्न करीन असे आश्वासन देत उपस्थित विद्यार्थी व पालक यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी सर्वांचे स्वागत करून विद्यार्थ्यांशी सवांद साधत या विद्यार्थ्यांनी सुद्धा समाजिक बांधिलकी जपली पाहिजे,आपले आई वडील,गुरुजन,मार्गदर्शक यांचा योग्य सन्मान केला पाहिजे आदर्श ठेवला पाहिजे व समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हे कायम लक्षात ठेवले पाहिजे असे बच्चे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
फाउंडेशन संस्थापक कडुलकर यांनी फाउंडेशनची उपस्थितांना थोडक्यात माहिती दिली.
माजी नगरसेवक ह.भ.प.आप्पा बागल यांनी फाउंडेशनला मदत तर केलीच पण आवर्जून उपस्थित राहून फाउंडेशनचे कौतुक करून श्यक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
अध्यक्ष मधुकर बच्चे, संस्थापक क्रांती कुमार कडुलकर, उपाध्यक्ष सोनाली मन्हास,सल्लागार रवींद्र,खजिनदार दिलीप चक्रे, दारासिंग मन्हास, सलीम सय्यद,प्रा.मेघना भोसले, विलास गटने, विलास जगताप, अरविंद पाटील, खुशाल दुसाने, परमानंद सोनी, धनराज गवळी, शंकर कुलकर्णी, मोहम्मद शेख, जाकीर सय्यद, मुकुंद इनामदार, जावेद शेख, अर्जुन पाटोळे, सुरेंद्र जगताप, रवींद्र इंगळे, रवींद्र शेटे, अभिजीत सागडे, हर्षदा सागडे, अनिल गोरे, धनंजय मांडके, वासंती काळे, प्रसाद कुलकर्णी, हनीफ सय्यद
अभिजीत,कुलकर्णी,अर्चना कुलकर्णी,नंदकुमार वाडेकर, असावरी बच्चे, रकेशा जैन,श्रावणी बच्चे,यश डोळे,दत्तात्रय सातव,स्मिता बागल,
आदी प्रमुख पदाधिकारी सदस्य व विद्यार्थी , पालक उपस्थित होते.
उपाध्यक्षा सोनाली मन्हास यांनी शिक्षणाचे महत्व अधोरेखित करीत सूत्रसंचालन केले
सहसचिव मंगला डोळे – सपकाळे यांनी सुमधुर आवाजात सामुदायिक पसायदान केले
धनंजय मांडके यांनी आभार मानले.
