विखरण येथे धरती आबा जन भागीदारी अभियान योजना अंतर्गत जनजागृती कार्यक्रम
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
*विखरण (देवाचे):-२१ जून २०२५ रोजी श्री.गणेश फाउंडेशन लोहगाव संचलित, “निवासी आदिवासी मुलींची प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा विखरण (देवाचे) ता.शिंदखेडा जि.धुळे यांनी जनजातीय मंत्रालय,भारत सरकार , नवी दिल्ली प्रस्तुत धरती आबा जनभागीदारी अभियाना अंतर्गत विविध गावात जाऊन लोकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. व ज्यांचे आधार कार्ड,किसान कार्ड,आयुष्यमान कार्ड व इतर योजनांचा लाभ बाकी असेल अशा व्यक्तींना जागरूक करून ते काढून घेण्याचे माहिती सांगण्यात आले. सदर कार्यक्रमास शाळेचे संस्थेचे सचिव दादासो प्रवीण पाटील मुख्याध्यापक श्री.एच.एम. चव्हाण सर व शिक्षक कर्मचारी श्री. ज्ञानेश्वर पाटील सर, सोनवणे सर, वळवी सर, श्री संजय पराडके सर गिरासे मॅडम गोसावी मॅडम उगले मॅडम देशमुख मॅडम आदी उपस्थित होते.
