टायगर ग्रुप पोलीस मित्र (महाराष्ट्र राज्य) शाखा जालना अध्यक्ष प्र व तिनिधी तर्फे मा. पोलीस अधीक्षक जालना यांना लेखी निवेदन.
प्रतिनिधी- सारंग महाजन.
जालना येथे दि.10/06/2025 रोजी जिल्हा निवेदन समितीची बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या बैठकी वेळी जिल्ह्यातील अनुदान घोटाळा व शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी निवेदन देण्यासाठी अनेक शेतकरी बांधव आले होते. त्यावेळी पालकमंत्री यांना निवेदन देण्यासाठी शेतकरी बांधव प्रयत्न करीत होते. त्यावेळी मुजर पोलीस अधिकाऱ्यांनी शेतकरी बांधवांना गावगुंड प्रमाणे आरोपी असल्याप्रमाणे अपमानास्पद वागणूक दिली गेली त्यामुजर पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
अन्यथा टायगर ग्रुप पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. अशा स्वरूपाचे लेखी निवेदन जालना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले. निवेदन देण्याकरिता टायगर ग्रुप पोलीस मित्र संघ जालना जिल्हाध्यक्ष गोविंद भाऊ मगर व इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
