चौसाळा ते साञा एस टी बससेवा सुरु
सचिन आगलावे यांच्या निवेदनाची आगार प्रमुखानी घेतली दखल
(चौसाळा प्रतिनिधी ) विवेक कूचेकर
बीड तालुक्यातील चौसाळा ते साञा बससेवा सुरू करण्यात यावी याबाबतीत भारतीय विद्यार्थी सेनेचे मा. बीड जिल्हा सचिव सचिन आगलावे यांनी बीड आगार प्रमुखांना निवेदनाद्वारे ईशारा दिला होता की चौसाळा ते साञा बससेवा तात्काळ सुरु करण्यात यावी अन्यथा बीड आगारा मध्ये विद्यार्थ्यांना सोबत घेवून शाळा भरवण्याचा ईशारा दिला होता या निवेदनाची दखल घेवून बीड आगार प्रमुखानी तात्काळ दि. 19 पासुन चौसाळा ते साञा ही बससेवा सुरू केली असल्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसुन आला या मार्गावर साञा पोञा,देवीबाभळगाव, अंधापुरी, सावरगाव ईत्यादी गावे असुन सध्या पावसाळयाचे दिवस असल्याने विद्यार्थी वर्गाचे तसेच वृध्द लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत होते याठिकाणी कुठलिही बससेवा नसल्यामुळे येथील नागरिकांना अनेक गोष्टीचा सामना करावा लागत होता खाजगी वाहनाने प्रवास करणे अवघड होवुन बसले होते याबाबतीत भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी बीड जिल्हा सचिव सचिन आगलावे यांनी परिवहन मंत्री व बीड आगार प्रमुखांना निवेदन देवुन बससेवा सुरू न केल्यास बीड आगारा मध्ये शाळा भरवण्याचा ईशारा दिला होता या निवेदनाची दखल घेवून तात्काळ बससेवा सुरू केल्यामुळे येथील नागरिकांनी बीड आगार प्रमुखासह भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी बीड जिल्हा सचिव सचिन आगलावे यांचे आभार मानले आहेत.
