मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
सणसर :- विकास क्षत्रिय
एकनाथ शिंदे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्याचे प्रमुख मा. मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुका एकनाथ शिंदे वैद्यकीय मदत कक्ष यांच्या मार्फत सणसर भवानीनगर भागात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याकार्यक्रमाचे उदघाटन छत्रपती कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव साहेब व हनुमंत करवर साहेब पुणे जिल्हा अध्यक्षा विद्याताई राजे गायकवाड यांच्या शुभहस्ते संप्पन झाला.
यावेळी इंदापूर तालुका प्रमुख सुनील निंबाळकर इंदापूर तालुका अध्यक्ष माहिती अधिकार संघटनेचे अध्यक्ष विकास क्षत्रिय,खरेदी विक्री संघांचे संचालक अमोल भोईटे माजी ग्रामपंचायत सदस्य शरद कांबळे,सामाजिक कार्यकर्ते राहुल जगताप, विक्रम भैय्या निंबाळकर,अभिजीत गायकवाड,बाला पाटील,गणेश गायकवाड, किरण घोरपडे आदी कार्यकर्ते व महिला पदाधिकारी उपस्थित होते.
