एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

हरवलेल्या बाळाचे पालक शोधण्यास म. गांधी चौक पोलीसांना यश… अवघ्या ४ तासांत पालकांचा शोध… महात्मा गांधी चौक पोलीस नेहमीच प्रयत्नशील

हरवलेल्या बाळाचे पालक शोधण्यास म. गांधी चौक पोलीसांना यश… अवघ्या ४ तासांत पालकांचा शोध… महात्मा गांधी चौक पोलीस नेहमीच प्रयत्नशील,

संभाजी पुरी गोसावी (सांगली जिल्हा ) प्रतिनिधी.

काल दि.१६.०६.२०२५ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेण्याच्या सुमारांस मिरज शहरांतील जुने बस स्थानक समोर अंदाजे ४ वर्षाचा मुलगा हरवलेल्या परिस्थितीत मिळून आला होता. सदर लहान मुलास डी. बी पथकांतील अंमलदार यांनी तात्काळ सुखरूप ताब्यात घेवुन पो. ठाणे येथे हजर केले होते.
महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डी.बी पथकांतील अधिकारी व अंमलदार यांनी सदर मुलाचे पालकांचा CCTV कॅमेरा फुटेजच्या साह्याने कसुन तपास केला. सदरचा मुलगा त्याचे आई सोबत मिरज येथे आल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरून प्रवास केलेल्या वाहनाचा उलट तपास करीत पथकांने सोनी गावात पोहंचून पालकांचा शोध घेतला. सदर मुलाची आई हीस कमी समज असल्याने ती सदर बालकांस मिरज बस स्थानक परिसरांत सोडून गेली असल्याचे निदर्शनास आले. मुलाचे वडील MIDC येथे मजुरी करत असल्याची माहिती घेवून त्यांना पोलीस ठाणे येथे समक्ष घेवून येवून सदर मुलास म. गांधी चौक पोलीस ठाणे येथे आई वडीलांच्या ताब्यात सुखरूप दिले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे मा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील स.पो.नि संदीप शिंदे, पो.उ.पनि रुपाली गायकवाड, पोहेकॅा अभिजित धनगर, महिला अंमलदार साक्षी पतंगे, पो.ना/नाना चंदनशिवे, पोकॅा मोहसीन टिनमेकर, जावेद शेख यांचे पथकांने केली आहे. महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संदीप शिंदे हे नेहमीच प्रयत्नशील दिसून येतात त्यांच्या विविध कामगिरीने त्यांना विविध पुरस्कारांने देखील प्रशासनाकडून गौरविण्यात आले आहे,

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link

error: Content is protected !!