अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनीधी सतीश कडू नागपूर
दिनांक 16 6 2025 रोजी रात्री नऊ वाजता चे सुमारास प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे परिमंडळ अधिकारी श्री सागर सुरेश वावरे व पुरवठा विभागातील इतर अधिकारी यांनी ताज नगर तुकडोजी पुतळा परिसरातील शुभ किराणा अँड जनरल स्टोअर समोरील एका टीनाच्या शेडमध्ये भेट दिली असता तेथे शेडमध्ये तांदूळ व त्यामधून आयशर गाडी क्रमांक एम एच 40 सीएम 0 235 मध्ये तांदूळ भरण्याचे काम चालू असल्याचे आढळून आले. पंचांना आमंत्रित करून पुढील कार्यवाही करण्यात आली.
पंचां समक्ष गाडी मध्ये तांदूळ भरत असलेल्या कर्मचारी यांना तांदूळ व खरेदी-विक्री पावत्या व परवाना याबाबत विचारले असता त्यांनी सदर तांदूळ हा मोहम्मद वसीम मोहम्मद रफी यांचा असून ते बाहेर गेले आहे लवकर येतात असे सांगितले मोहम्मद वसीम मोहम्मद रफीक मोका ठिकानी आल्यावर त्यांना शेड व गाडीमध्ये आढळून आलेला अंदाजे 200 कट्टे तांदूळ बाबत व त्याचे खरेदी विक्री कागदपत्रे व इतर परवाना बाबत विचारले असता त्यांनी माझ्याकडे काहीही नाही नंतर आणून देतो असे सांगितले
त्यानंतर पंचांसमक्ष सदर तांदळाची पाहणी केली असता त्यामध्ये गुणावर्धित तांदूळ जो पोषणमूल्य वाढवण्यासाठी शासनाकडून पुरवल्या जातो त्या तांदुळाचे दाणे आढळून आले त्यानुसार सदर धान्याचे नमुने काढण्यात आले व सदर धान्य हे शासकीय असल्याने धान्य व आयशर गाडी ज्याचा क्रमांक एम एच 40 सीएम 0235 हे जप्तीनामा करून जप्त करण्यात आले
त्यानुसार आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 नुसार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही अजनी पोलीस स्टेशन येथे करण्यात आली.
वरील कार्यवाही मध्ये एकूण 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर कार्यवाही ही अन्नधान्य वितरण अधिकारी श्री विनोद काळे यांच्या मार्गदर्शनात परिमंडळ अधिकारी सागर सुरेश बावरे, दिपाली बनसोड व वैभव खैरकर यांनी केली
पुरवठा विभागातर्फे सर्वांना आवाहन करण्यात येते की शासकीय तांदूळ हा लाभार्थ्यांना त्याचे पोषणमूल्य वाढवून वितरित करण्यात येतो येतो व त्याची अवैधरित्या कुठेही खरेदी विक्री होत असल्यास पुरवठा विभागाचा संपर्क साधावा.
