एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आयुक्त नवल किशोर राम यांचा भाजपच्या नेत्याला दणका, ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांना महापालिकेत येण्यास प्रवेश बंदी

आयुक्त नवल किशोर राम यांचा भाजपच्या नेत्याला दणका, ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांना महापालिकेत येण्यास प्रवेश बंदी

संभाजी पुरी गोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.

भाजपच्या पदाधिकाऱ्याने पुणे महापालिकेच्या एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला गेल्या पाच महिन्यांपासून मानसिक त्रांस देवुन छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत संबंधित महिला अधिकाऱ्याने महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली असुन. महापालिकेत भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ओंकार दिलीप कदम आणि अक्षय कांबळे यांना महापालिकेत पुढील आदेशापर्यंत प्रवेश बंदी केल्याचे परिपत्रक पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी काढले आहे. भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ओंकार दिलीप कदम यांच्याकडून गेल्या पाच महिन्यांपासून पालिकेतील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला त्रांस देण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशी तक्रार कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ कायदा 2013 अन्वये प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने पालिका आयुक्त यांनी परिपत्रक काढत दोन्ही भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर पालिकेत येण्यास प्रवेश बंदी घातली आहे. यावेळी ओंकार कदम पुढे म्हणाले आमच्याकडून महिला अधिकाऱ्याला त्रांस दिला नाही. आरोग्य विभागांच्या कारभाराविषयी तक्रारी आल्यानंतर आम्ही प्रथम माहिती अधिकारात माहिती मागवली होती. या माहितीत तथ्य असल्याने बदली होण्याच्या भीतीने संबंधित महिला अधिकाऱ्याने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. दोषी आढळल्यास पक्षाच्या पदाचा राजीनामा देईन असेही ओंकार कदम यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे,*

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link