एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जोगेश्वरीत राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी – किशोर रमाकांत गुडेकर, मुंबई विभाग प्रतिनिधी प्रमुख

जोगेश्वरीत राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप कार्यक्रम संपन्न

मुंबई, दि. १४ जून २०२५ (प्रतिनिधी) –
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, मराठी अस्मितेचे प्रतीक आणि हजारो युवांचे प्रेरणास्थान सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना (जोगेश्वरी पूर्व) आणि महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने एक समाजोपयोगी उपक्रम — फळवाटप कार्यक्रम — आयोजित करण्यात आला.
हा कार्यक्रम हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर मनपा रुग्णालय, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई येथे पार पडला. या उपक्रमात रुग्ण, त्यांच्या नातेवाईक तसेच रुग्णालय कर्मचाऱ्यांना ताज्या फळांचे वाटप करण्यात आले.
राजसाहेबांचा वाढदिवस जल्लोषात न साजरा करता, सामाजिक बांधिलकी जपत जनसेवेमार्फत साजरा करण्याचा हेतू या उपक्रमामागे होता.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री. जितेंद्र पाटील (जिल्हाध्यक्ष, रायगड व अध्यक्ष – महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना), श्री. निलेश दूर्वांस खोत (सचिव – मुंबई विभाग), माजी नगरसेवक भालचंद्र अंबुरे (आप्पा), तसेच अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मिळून केले.
या वेळी अनेक मनसे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, नवनिर्माण सेनेचे युवा सदस्य यावेळी शाखाध्यक्ष श्री. विनोद शिंदे, मनसैनिक श्री. निलेश मांगडे, श्री. प्रकाश टोपले, श्री. प्रवीण बोरकर, श्री. मेहबूब भाई, कु. सोनाली पाटील,गणेश पितळे उपस्थित होते या उपक्रमामुळे
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक रहिवाशांनी आणि रुग्णालय प्रशासनाने मनसे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link