मनसे मार्केट यार्ड शाखेच्या अनेक वर्षा पासूनच्या लढ्याला अखेर यश.
संपादकीय
११ जून २०२५ – गंगाधाम चौक, पुणे
एका निरपराध महिलेचा अपघाती मृत्यू — केवळ एक दुर्घटना नव्हे, तर आपल्या शहरातील वाहतूक व्यवस्थेतील गंभीर त्रुटींचं दर्शन घडवणारी अत्यंत वेदनादायक घटना.
या दुर्घटनेनंतर पुण्याचे गतिमान, संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष पोलिस आयुक्त मा. अमितेश कुमार सर यांनी स्वतः घटनास्थळी येऊन पाहणी केली.
नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर विचार करत त्यांनी तात्काळ उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष कृती सुरू झाली.
गंगाधाम चौकामध्ये अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर संरचनात्मक सुधारणा.
:- सकाळी ६.०० ते रात्री ११.०० पर्यंत जड वाहनास वाहतुकीस मनाई केली आहे.
:- याचबरोबर, शत्रुंजय मंदिर रोड वरील सर्व अनधिकृत गोडाऊनवर कारवाई करण्याचे आदेशही मा. आयुक्त साहेबांनी दिले आहेत.
या गोडाऊनमुळे दररोज मोठ्या प्रमाणात ट्रक, डंपर आणि अवजड वाहनांची वर्दळ होते.
या वाहनांमुळे परिसरात अपघाताची शक्यता वाढत असून अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.
त्यामुळे या अनधिकृत गोडाऊनना सील करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
ही घटना आता केवळ एक दुःखद आठवण न राहता, शहरातील रस्ते, वाहतूक व नागरी सुरक्षेबाबत सजगता आणि कृतीशीलतेची प्रेरणा ठरावी, हीच अपेक्षा.
वाहतूक शिस्त पाळा – प्रत्येक जीव अमूल्य आहे.
आपलाच,
मंगेश प्रकाश जाधव
उप अधक्ष्य ( पर्वती मतदार संघ )
व मार्केट यार्ड, बिबवेवाडी भागातील सर्व महाराष्ट्र सैनिक.
