सात्रा चांदणी ग्रामपंचायत मार्फत ओबीसी टार्गेट व ऑनलाईन घरकुल मंजूर यादी तात्काळ प्रसिद्ध करावी- सचिन आगलावे
(बीड प्रतिनिधी ) विवेक कुचेकर
बीड तालुक्यातील साञा- चांदणी ग्रुप ग्रामपंचायत ही अनेक कारणाने चर्चेत येत असुन ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारामुळे नागरिक वैतागले असुन शासनाच्या विविध योजनाची माहीती देण्यास ग्रामसेवक हे टाळाटाळ करत आहेत शासन प्रत्येक बेघर नागरिकांना घरकुल देत असुन परतु येथिल ग्रामसेवक हे ओबीसी ट्रागेट किती आहे ओनलाईन किती नागरिकांचे घरकुल केले, प्रतिक्षा यादी मधील किती लाभार्थी आहेत याबाबत कुठलीच माहीती देत नसुन हम करेसो कायदा या म्हणी प्रमाणे वागत असुन गोरगरीब बेघर लोकांना शासन घरकुल देत असताना ग्रामसेवक हे मर्जीतल्या लोकांना या घरकुल योजनेचा लाभ देत असल्याचे चिञ दिसुन येत असुन या ग्रामपंचायत मार्फत विविध योजना ह्या कागदोपञी राबविल्या असुन शालेय शिक्षण निधी तसेच रस्ते विकास निधी मध्ये देखील मोठा भ्रष्टाचार झाला आहे साञा – चांदणी ग्रामपंचायत च्या ग्रामसेवकाचा मनमानी कारभार तात्काळ थांबवुन ओबीसी घरकुल योजनेचे ट्रागेट किती, ओनलाईन घरकुल मंजुर यादी तसेच प्रतिक्षा यादी तात्काळ जाहीर करावी अन्यथा साञा- चांदणी ग्रामपंचायतच्या विरोधात बीड पंचायत समिती समोर ञिव स्वरूपाचे आंदोलन करण्याचा ईशारा भारतीय विद्यार्थी सेनेचे मा. बीड जिल्हासचिव सचिन आगलावे यांनी दिला आहे.
