नो-पार्किंगमध्ये गाडी उचलण्यावर प्रश्नचिन्ह; ट्रॅफिक पोलिसांची कारवाई नियमबाह्य
📍 पुणे | कार्यकारी संपादक किरण सोनवणे
शहरातील विविध ठिकाणी नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर ट्रॅफिक पोलिसांकडून दररोज कारवाई केली जाते. मात्र नागरिकांमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे – “ट्रॅफिक पोलिसांना अशा गाड्या उचलण्यासाठी स्पष्ट नियम किंवा एसओपी (Standard Operating Procedure) आहे का?”
विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी नो-पार्किंगचे स्पष्ट फलक नसतानाही गाड्या उचलल्या जातात. यामध्ये नागरिकांची अडवणूक होत असून, त्यांना भरमसाठ दंड भरावा लागत आहे.
वाहनधारकांनी असा आरोप केला आहे की, काही वेळा ना फोटो काढले जातात ना पावती दिली जाते. या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन होत असून नागरिकांच्या हक्कांवर गदा येत आहे.
*तक्रारदारांचा आरोप:*
> “माझी गाडी मी साइडला लावली होती. ना फलक होता, ना अडथळा निर्माण झाला होता. तरीसुद्धा गाडी उचलून नेली आणि ५०० रुपये दंड लावला,” – असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले.
🧾 नियम काय सांगतात?
मोटार वाहन कायदा 1988 आणि बॉम्बे पोलीस कायद्यानुसार, फक्त स्पष्ट सूचना आणि अडथळा झाल्यासच गाडी उचलण्याची परवानगी आहे. त्यासाठी फोटो, पावती आणि कायदेशीर दंडाची प्रक्रिया बंधनकारक आहे.
*विशेषतः:*
No Parking बोर्ड असणे आवश्यक
कारवाईपूर्वी फोटो काढणे आवश्यक
दंड पावती देणे बंधनकारक
*तज्ज्ञांचे म्हणणे:*
> “गाडी उचलणे ही शेवटची उपाययोजना असावी. अयोग्य पद्धतीने कारवाई झाली असेल तर नागरिक RTI किंवा न्यायालयीन उपायांचा आधार घेऊ शकतात,” – म्हणाले एका वाहतूक कायदेतज्ज्ञांनी.
