सांगलीच्या पत्रकारांकडून सातारा जिल्ह्याच्या नवनियुक्त आदरणीय जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचा सत्कार
संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी… सातारा
सातारा जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी साहेबांची आज रोजी सकाळी सातारा पोलीस मुख्यालयात सांगली जिल्ह्यातील MS मराठी न्यूज चे मुख्यसंपादक महंमद शेख, 7 स्टार न्यूज जत तालुका प्रतिनिधी विठ्ठल हेगडे यांच्याकडून जयहिंद साहेब असे म्हणत... स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या, यापूर्वी पुणे लोहमार्गाचे पोलीस अधीक्षक म्हणून ते कार्यरत होते, मागील दहा दिवसांपूर्वी राज्य गृह विभागाकडून झालेल्या बदल्यांमध्ये आयपीएस अधिकारी तुषार दोशी सातारा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे आजपर्यंतच्या इतिहासात सातारा जिल्हा पोलीस दलाला एक कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम अधिकारी, अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सोबत घेवुन काम करणारा आणि सर्वांशी मनमिळावू,प्रेमळ असे आयपीएस अधिकारी सातारा जिल्ह्याला लाभले आहेत. यावेळी MS मराठी न्यूज मुख्य संपादक महंमद शेख, सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी,7 स्टार जत तालुका प्रतिनिधी विठ्ठल हेगडे,रूपेश हेगडे यांच्याकडून सातारा पोलीस अधीक्षक साहेबांचे स्वागत करण्यात येत आले, यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी साहेबांशी थोडक्यात मनमोकळा संवाद साधला..
