पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
बाशी ईद निमित्त सारसबाग उद्यान बंद ठेवल्याबद्दल महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स च्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम व पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन देऊन जाहीर निषेध नोंदवण्यात आला,
बकरी ईद सणाच्या दुसऱ्या दिवशी बासी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात पुणे शहराच्या उद्यानामध्ये जात असतात पुणे शहरातील सारसबाग उद्यान बंद ठेवल्याने पुणे शहरातील मुस्लिम समाजातील नागरिकांचे गैरसोय झाल्याबद्दल महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स च्या वतीने याचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला महापालिकेतील उद्यान विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी याकरिता पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि पुणे निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना या संदर्भाचे निवेदन देण्यात आले भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न करत आहे, तसेच नागरिकांचे हक्क अबाधित ठेवण्याची मागणी करण्यात आली असून तत्काळ मुस्लिम समाजाची पुणे महापालिका आयुक्तांनी माफी मागावी अशी विनंती करण्यात आली आहे,
यावेळी महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे संस्थापक अध्यक्ष हाजी जुबेर मेमन, आझाद समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष सुलतान शहा, पुणे शहर अध्यक्ष फरीद खान, पुणे शहर महिला अध्यक्षा फरहीन सय्यद, युवा अध्यक्ष पुणे शहर गौस शेख, डॉ, फरदीस सय्यद, हसीना काझी, वंदना कांबळे, पन्ना कोडीतकर, आदि यावेळी उपस्थित होते,
