अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
खासदार मा. डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने संयुक्त अरब अमिरात, काँगो, सिएरा लिओन आणि लायबेरिया या देशांचा यशस्वी दौऱ्याबद्दल पंतप्रधानाकडून सन्मान
प्रतिनिधी सतीश कडू
लोककल्याण मार्ग, दिल्ली येथे संयुक्त अरब अमिरात, काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, सिएरा लिओन आणि लायबेरिया या देशाचा दौरा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याचा मान पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी संसदरत्न, महाराष्ट्राचे खासदार मा. डॉ. श्रीकांत एकनाथजी शिंदे साहेबांना देवून आज त्यांचा सन्मान करण्यात आला.
दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या दृढ लढाईला आणि जागतिक शांततेसाठी डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या अढळ वचनबद्धतेला या मित्र राष्ट्रांनी दिलेला प्रचंड पाठिंब्याची पंतप्रधानांना माहिती देण्यात आली.
पंतप्रधानांनी शिष्टमंडळाच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि जागतिक स्तरावर भारताचे स्थान वाढवण्यासाठी त्यांचे प्रेरणादायी दृष्टिकोन सांगितले. त्यांच्या शब्दांमुळे डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शिष्टमंडळाला देशासाठी अथक परिश्रम करण्याची प्रेरणा मिळाली.
पंतप्रधान व शिष्टमंडळाच्या भेटीदरम्यान भारताचा दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचा संदेश प्रभावीपणे देवून आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताच्या भूमिकेला स्पष्टपणे पाठिंबा दिला आणि शांतता आणि स्थैर्याचा पुरस्कर्ता म्हणून भारताच्या भूमिकेचे कौतुक करून हा जागतिक पाठिंबा मोदी सरकारच्या यशस्वी परराष्ट्र धोरणाचा पुरावा आहे.
या देशांमधील भारतीय समुदायाकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल पंतप्रधानांना माहिती देण्याची संधी डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शिष्टमंडळाला मिळाली असून आपल्या संस्कृतीचे आणि प्रगतीचे उत्साही आणि अभिमानी राजदूत आहेत.
पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत मजबूत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यात आणि सुरक्षित व शांततापूर्ण जागतिक वातावरण निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण प्रगती करीत असून डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळ हे स्वप्न पुढे नेण्यासाठी वचनबद्ध राहिल. असे सांगीतले
