एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सायकल चालवा, पर्यावरण वाचवा – डबेवाले संघटनेचे अध्यक्ष” सुभाष तळेकर यांचे आवाहन

प्रतिनिधी-किशोर रमाकांत गुडेकर,मुंबई विभाग प्रतिनिधी प्रमुख

सायकल चालवा, पर्यावरण वाचवा – डबेवाले संघटनेचे अध्यक्ष” सुभाष तळेकर यांचे आवाहन

मुबंई दि. ०७, ( अनुराग पवार )
सायकल चालविणे आरोग्यासमवेतच पर्यावरणीयदृष्ट्याही हितकारक असून शहरात सायकल संस्कृती रुजविण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संघटना आणि वैयक्तिकरित्याही सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे वक्तव्य मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सायकल दिवसाच्या पुर्व संघ्येला केले आहे.
तरूण मुलांमध्ये सायकलिंगबद्दल प्रेम वाढत आहे ही चांगली बाब आहे. परंतु सायकलसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती आपणाकडे निर्माण झाली पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.
सुभाष तळेकर यांनी नमूद केले की, जवळपास दोन शतकांपासून आपण सायकलीचा वाहतुकीसाठी वापर करत आहोत. सायकलीच्या वापराबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी सायकल दिन साजरा केला जातो. हल्ली कमी अंतराच्या प्रवासासाठीही दुचाकी आणि चारचाकींचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे प्रदूषण, तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. हे सर्व थांबविण्यासाठी शक्य तेवढ्या जास्त प्रमाणात प्रवासासाठी सायकलचा वापर करणे, हाच एकमेव पर्याय असू शकतो.

 

आंतराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवलेले मुंबईचे डबेवाले गेली कित्येक वर्ष मुंबईत डबे पोहचवण्याची सेवा सायकलच्या माध्यमातून देत आहेत. खिशाला परवडेल अशा किमतीत उपलब्ध असलेली सायकल त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असे वाहन आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत परंतु सायकलला इंधन लागत नसल्यामुळे इंधन वाढीची चिंता येथे नाही. सायकल पर्यावरणपूरक असल्यामुळे तिच्यामुळे प्रदूषणालाही आळा बसतो, असेही ते पुढे म्हणाले.
व्यवसायनिमित्त डबेवाल्यांना दररोज अनेक किलोमिटरचे अंतर सायकलनेच गाठावे लागते. सायकल चालवण्याच्या या रोजच्या सवयीमुळे डबेवाले अत्यंत तंदुरुस्त असून रक्तदाब, मधुमेह, हदयविकारासारखे आजारही त्यांच्यापासून दूर आहेत. त्यामुळे साठी,सत्तरी पार केलेले डबेवाले देखील सायकलच्या माध्यमातन डबे पोहचवण्याचे काम अद्यापही करत आहेत. दररोज सायकल चालवून सर्व आजारांना दूर ठेवा आणि तंदुरुस्त राहा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link