प्रत्येक नागरिकाने मरणोपरांत नेत्रदानाचा संकल्प करावा
प्रतिनिधी- सारंग महाजन.
स्नेहबंधच्या वतीने आवाहन, नेत्रदान जागृती पोस्टरचे अनावरण
अहिल्यानगर – नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. केवळ नेत्रदानाचे संकल्प पत्र भरून देऊन थांबू नये तर आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्र दुसऱ्याला दृष्टी देण्याकरिता उपयोगी आणावे, प्रत्येक नागरिकाने मरणोपरांत नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले आहे.
स्नेहबंधच्या वतीने जागतिक नेत्र दिनानिमित्त जागृती पोस्टरचे अनावरण जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, आमदार संग्राम जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, मनपा आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, कृषी उपअधीक्षक सागर गायकवाड, युवा उद्योजक अमित खामकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, सर्वश्रेष्ठ समजले जाणारे नेत्रदान करण्याचे भाग्य प्रत्येकाने पदरी पाडून घ्यावे. कारण आपण केलेल्या नेत्रदानामुळे नेत्रहीन व्यक्तीदेखील या सुंदर सृष्टीचे विलोभनीय दृश्य बघू शकते.
मृत्यूपश्चात आपण कुणाच्या तरी आयुष्यातील अंधकार दूर करू शकतो, हा एकमेव विचार डोळ्यापुढे ठेवून प्रत्येकाने नेत्रदान
