श्री. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने सातारा पोलीस प्रशासन सज्ज राहणार
जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी
श्री. संत ज्ञानेश्वर पालखी प्रस्थान सोहळा सन 2025 पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात दिनांक 26 जून ते 30 जून पर्यंत जिल्ह्यात मुक्कामी असणार आहे, त्या अनुषंगाने सातारा जिल्हा पोलीस दल देखील सज्ज असणार आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. हा बदल लक्षात घेवुन पालखी कालावधीमध्ये वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दिनांक 26 जून ते 30 जून रोजी निरा-लोणंद फलटणमार्गे सातारा जिल्ह्यात मार्ग क्रमांक फलटण मार्गे पंढरपूर रस्त्याने जाणार आहे. तसेच पंढरपूरला दर्शनाकरिता जाता येत नसल्यामुळे दर्शनासाठी जिल्ह्यातून ग्रामीण भागातून अनेक भाविक भक्तगण पालखी सोहळ्याला येतात. पालखी मार्गावर कोणताही अपघात घडू नये वाहतूक समस्या निर्माण होऊ नये तसेच अनुचित प्रकार घडू नये याकरिता सातारा पोलीस प्रशासन सज्ज असणार आहे. अशी माहिती साताऱ्याचे जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी नुकतेच प्रसार माध्यमांतून दिली आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ( 34 ) प्रमाणे प्राप्त अधिकारत्वये पालखी सोहळ्यातील वाहनाखेरीच व अत्यावश्यक वाहने ) खेरीज करुन इतर सर्व वाहनांना निरा-लोणंद पंढरपूर या मार्गावर दिनांक 26 जून ते 30 जून या कालावधीत पूर्णता: प्रवेश बंद राहील तरी सर्व वाहनांना वेळापत्रकानुसार पर्यायी मार्गाचा वापर करावा जिल्हा पोलीस प्रशासनाला श्री. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी केले आहे.*
