पुणे (मुख्य संपादक): संतोष लांडे.
कोथरूड येथील वनाझ परिसरातील वनाझ परिवार सोसायटीच्या मीटर रूममध्ये आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. आग लागल्याचे कळताच शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक राज गोविंद जाधव यांच्या नेतृत्वाखालील टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आग विझवण्यासाठी मदत करत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आणि मोठी दुर्घटना टळली.
या प्रसंगी संगम मित्र मंडळ आणि वनाझ परिवारमधील स्वयंसेवकही तत्परतेने मदतीस धावले. नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी केलेल्या या सामूहिक प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज गोविंद जाधव, शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक व युवक काँग्रेसचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष, यांनी सांगितले की, “नागरिकांचे प्राण वाचवणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. भविष्यात अशा प्रसंगी मदतीस तत्पर राहू.”
