प्रतिनिधी: सुदाम येवले.
प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांची विशेष उपस्थिती; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने आयोजन
सोमाटणे, ०६ जून २०२५ :
सोमाटणे ग्रामपंचायत हद्दीतील शिंदे वस्ती, ठाकरवाडी येथे आज दिनांक ०६ जून २०२५ रोजी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन मावळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. सुनील आण्णा शेळके यांच्या विशेष पुढाकाराने करण्यात आले.
या आरोग्य शिबिराला मावळ-मुळशी उपविभागाचे प्रांताधिकारी श्री. सुरेंद्र नवले साहेब यांनी भेट देऊन शिबिराची पाहणी केली व उपस्थित ग्रामस्थांना आरोग्याचे महत्त्व पटवून देणारे मार्गदर्शन केले. त्यांनी ग्रामविकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता स्पष्ट केली.
शिबिरात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शाळकरी मुले, महिलावर्ग व ज्येष्ठ नागरिकांनी तपासणी करून घेत आरोग्याबाबत माहिती मिळवली. रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन तपासणीसह इतर मूलभूत आरोग्य सेवा मोफत पुरवण्यात आल्या.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. सचिन वामन यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांचे संयोजन व समन्वय कार्य उल्लेखनीय ठरले.
स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत भविष्यातही असे शिबिर नियमित आयोजित व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
