संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी . शहरांतील लहान मोठ्या रस्त्यावर पदपथावर झालेल्या अतिक्रमणांवर प्रभावी कारवाई होण्यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दोन वेळा अतिक्रमण विभागाचे प्रमुख बदलले अतिक्रमण निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या. मात्र परिस्थिती अशीच राहिली आता महापालिकेला नवल किशोर राम हे नवीन आयुक्त मिळाले आहेत आता तरी नवीन आयुक्त तरी हे चित्र बदलून शहर अतिक्रमणमुक्त करणार का? असा सवाल आता पुणेकरांकडून सवाल उपस्थित होत आहे. शहरांतील फेरीवाले आणि पथारी व्यवसायिकांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून वार्षिक शुल्क आकारुन फेरीवाला प्रमाणपत्र दिले जाते. मात्र पालिकेकडून कसलाही परवाना न घेता राजकीय नेत्यांच्या वरदहस्तातून शहरांतील पदपथ व रस्त्यांवर अतिक्रमणे करून व्यवसाय थाटले आहेत. यातून शहरांंत प्रवेश करणारे रस्तेही सुटलेले नाहीत रस्त्यांना पदपथ असतानाही फळे भाज्या व विविध वस्तू विक्री करणाऱ्या टेम्पो हातगाड्या रस्त्याच्या कडेला थांबून चांगलाच व्यवसाय करतात. रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणांवर प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल्यानंतर काही दिवस कारवाईचा देखावा झाला. मात्र तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अतिक्रमणांवर प्रभावी कारवाई व्हावी अधिकारी व व्यवसायिकांच्या संगनमताची साखळी तुटावी, यासाठी दोनवेळा अतिक्रमण विभागाचे प्रमुख बदलले, त्यानंतर काही दिवसांतच कारवाई थंड होऊन अतिक्रमणे जैसे थे..!! झाली. त्यामुळे आता नव्या आयुक्तांकडून अतिक्रमणांवर कायमस्वरूपी उपाय करणारी कारवाई होईल अशी अपेक्षा पुणेकर व्यक्त करत आहेत.
