एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कवंडे दौरा; 12 कुख्यात नक्षलवाद्यांची शरणागती, सी-60 कमांडोंचा गौरव

प्रतिनिधी : सतिश कडु | गडचिरोली, 6 जून

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावरील अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त कवंडे गावास भेट दिली. यावेळी त्यांच्या उपस्थितीत 12 कुख्यात नक्षलवाद्यांनी अत्याधुनिक शस्त्रांसह आत्मसमर्पण केले. आतापर्यंतच्या इतिहासात शस्त्रांसह इतक्या मोठ्या संख्येने शरणागती पत्करण्याची ही राज्यातील पहिलीच घटना ठरली आहे.

शरणागतीतून नवजीवनाकडे वाटचाल

या कार्यक्रमात शरणागती पत्करलेल्या माजी नक्षलवाद्यांचा सामूहिक विवाह सोहळाही गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवदाम्पत्यांना शुभेच्छा देत, नवे जीवन सुखी आणि सुरक्षित होवो, असा आशीर्वाद दिला.

सी-60 कमांडोंचा सन्मान व अत्याधुनिक शस्त्रसज्जता

सायंकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सी-60 कमांडोंचा सत्कार करत त्यांना AK-103 रायफल्स, एएसएमआय पिस्तुले, बुलेटप्रूफ जॅकेट्स आणि बुलेटप्रूफ गाड्या यांसह 19 वाहने प्रदान केली. जिल्हा नियोजन विकास निधीतून ही वाहने खरेदी करण्यात आली असून काही वाहनांमध्ये बुलेटप्रूफ सुविधा आहे.

नक्षलविरोधी अभियानाची ठोस प्रगती

फडणवीस म्हणाले, “गेल्या दीड वर्षांत 28 नक्षलवादी मारले गेले, 31 अटक झाले आणि 44 जणांनी शरणागती पत्करली. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे बक्षीस असलेलेही नक्षलवादी आहेत. हे अभियान आता अंतिम टप्प्यात असून मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचा पूर्णतः खात्मा करण्याचा आमचा निर्धार आहे.”

‘धरती आबा’ अभियानांतर्गत 987 लाभांचे वितरण

कवंडे, नेलगुंडा आणि पेनगुंडा या भागात ‘धरती आबा’ अभियान राबवण्यात आले. यामध्ये 533 लाभार्थ्यांना आयुष्मान भारत, पीएम किसान, अन्न सुरक्षा, मनरेगा, जात प्रमाणपत्र आदी योजनांचे 987 लाभ वितरित करण्यात आले. यामध्ये महसूल, आरोग्य, कृषी, महिला व बालकल्याण, वन विभाग, पोलिस आणि आदिवासी विकास प्रकल्पांचे अधिकारी सहभागी होते.

महाराष्ट्र-छत्तीसगडला जोडणाऱ्या पुलाची पाहणी

मुख्यमंत्र्यांनी कोरमा नाल्यावर उभारल्या जात असलेल्या 120 मीटर लांबीच्या आंतरराज्यीय पुलाची ड्रोनद्वारे पाहणी केली. 10 कोटी 70 लाख रुपयांचा हा प्रकल्प जिल्ह्यातील कनेक्टिव्हिटी वाढवून विकासात हातभार लावणार आहे.

गडचिरोली औद्योगिक केंद्र होणार

“गडचिरोलीला नक्षलमुक्त करून रोजगारयुक्त जिल्हा बनवायचा आहे. येथील निसर्ग, जल, जंगल आणि जमीन यांचे संरक्षण करत जिल्ह्याला ‘पोलाद नगरी’ म्हणून घडवायचा आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले. लॉईडसारख्या उद्योगांनीही पुनर्वसनासाठी सहकार्य दिले असल्याचे त्यांनी नमूद केले.

नव्या पर्वाची सुरुवात:

मुख्यमंत्री फडणवीस यांचा कवंडे दौरा केवळ सुरक्षा दृष्टीकोनातून नव्हे, तर नवजीवन, पुनर्वसन आणि विकासाच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल ठरले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link