प्रतिनिधी: संतोष लांडे | पिंपरी
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) ने १ जून २०२५ पासून १० वर्षांनंतर तिकीट दरात वाढ केली.
या दरवाढीमुळे:
किमान तिकीट: ₹५ वरून ₹१०
दैनिक पास: ₹४० वरून ₹७०
मासिक पास: ₹९०० वरून ₹१,५००
या वाढीमुळे पीएमपीच्या उत्पन्नात तब्बल ५०% वाढ झाली असून, पिंपरी, भोसरी, निगडी आगारांतून धावणाऱ्या ३९१ बस रोज ४,३९२ फेऱ्या करतात. या उत्पन्नवाढीचा उपयोग इंधन खर्च, देखभाल, नवीन सीएनजी बसेस, आणि डिजिटल तिकीट प्रणालीसाठी केला जाणार आहे.
प्रवाशांचे मत आणि चिंता:
दरवाढ ही प्रवाशांच्या खिशावर मार असल्याचे अनेक प्रवाशांचे मत
बसेसची वेळेवर उपलब्धता, स्वच्छता, आणि दुरुस्ती अजूनही अपुरी
विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत नाराजीचा सूर
खासगी वाहनांपेक्षा पीएमपी महाग वाटू लागली
महिन्याचे बजेट कोलमडल्याची तक्रार
प्रशासनाच्या प्रतिक्रिया:
जनसंपर्क अधिकारी किशोर चौहान यांनी सांगितले की, दरवाढ ही व्यवस्थापनासाठी अपरिहार्य होती.
