मुख्य संपादक : संतोष लांडे.
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की, सध्या सर्व पक्ष आपापली ताकद वाढवत आहेत आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी एकत्र बसून निर्णय घेणार आहोत. सध्या काहीही ठरवण्याची घाई नसल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख मुद्दे:
बीड प्रकरणावर अजित पवार म्हणाले की, चुकीचे वागणाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल. काही शस्त्र परवाने रद्द केले गेले आहेत व अन्यांची चौकशी सुरू आहे.
मंत्र्यांनी काही बोलायचे असल्यास ते मंत्रिमंडळ बैठकीत बोलावे, सार्वजनिक वक्तव्यांमुळे गैरसमज होतात.
लक्ष्मण हाके व अमोल मिटकरी यांच्यातील वाद अप्रिय असून सर्वांनी तारतम्य ठेवायला हवे, असेही त्यांनी सुचवले.
सरकार कोणत्याही समाज घटकावर अन्याय होऊ देणार नाही, असे सांगत त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या बजेटवाढीचा उल्लेख केला.
दोन्ही राष्ट्रवादी गटांचा वर्धापन दिन एकाच दिवशी साजरा होणार असून, त्यावर पवार यांनी हसत उत्तर टाळले.
‘इंजिन आणि मशाल’ एकत्र यायचं की नाही, हे त्यांनीच ठरवायचं; आम्हाला का विचारता? असा सवालही त्यांनी पत्रकारांना केला.
