मुख्य संपादक: संतोष लांडे.
पुणे – आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या वारीसाठी निघणाऱ्या वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन, एसटी महामंडळाने यंदा पुण्यातून तब्बल ७०० बस पंढरपूरकडे धावविण्याचे नियोजन केले आहे. त्यामध्ये पुणे विभागाच्या ३५० तर मुंबई व विदर्भातून मागविलेल्या ३५० बस समाविष्ट आहेत.
प्रत्येकवर्षी राज्यभरातून हजारो भाविक पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने प्रयाण करतात. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बसांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. गतवर्षी ५५८ बस सोडण्यात आल्या होत्या, तर यंदा ही संख्या ७०० पर्यंत नेण्यात आली आहे.
ग्रुप बुकिंगसाठी खास सुविधा एसटी महामंडळाने यावर्षी एक नवी सुविधा सुरू केली असून, एका गावातील किमान ४० जणांनी ग्रुप बुकिंग केल्यास, एसटी बस थेट त्यांच्या गावात येणार आहे. वारीनंतर दर्शन घेऊन हीच बस त्यांना त्यांच्या गावी परत आणणार आहे. ही सुविधा भाविकांसाठी अधिक सोयीस्कर आणि थेट ‘घर ते पंढरपूर’ प्रवास सुनिश्चित करणारी ठरेल.
वारकऱ्यांसाठी नियोजनाचा आढावा:
पुणे विभागातील गाड्या: ३५०
इतर विभागातून गाड्या: ३५०
एकूण बस: ७००
मागील वर्षीच्या तुलनेत वाढ: १४२ बस
प्रमुख आगारे: स्वारगेट, शिवाजीनगरसह पुणे जिल्ह्यातील सर्व १४ आगारातून गाड्या धावणार.
– अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी पुणे विभाग:
“वारीच्या काळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी अतिरिक्त बसची व्यवस्था केली आहे. तसेच थेट गावातून सेवा देणारी योजनाही सुरु केली आहे.
