आंबेगाव खुर्द (पुणे) – युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त गुरूछाया वृद्धाश्रम, वाघजाईनगर येथे वयोवृद्ध आजी-आजोबांना खाऊ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणेश महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. अध्यक्षस्थानी कांताभाऊ राठोड होते.
या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र उपविभाग प्रमुख कांताभाऊ राठोड, पश्चिम महाराष्ट्र सचिव संतोष लांडे, हवेली तालुका अध्यक्ष सतीश कोकरे, तालुका उपाध्यक्ष अमोल मोरे, पिंपरी-चिंचवड शहर संपर्कप्रमुख लक्ष्मण खैराटे तसेच अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान संघटनेच्या वतीने पत्रकार बांधवांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले. पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी संघटना सदैव तत्पर असल्याचे ही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
सामाजिक उत्तरदायित्व जपत वृद्ध नागरिकांसाठी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
