लातूर, ५ जून २०२५ : लोकाधिकार संघाच्या कार्यविस्ताराच्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील अहिल्यानगर येथे एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पिंपरी चिंचवड महानगर या तीन विभागांसाठी नव्या जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली.
लोकाधिकार संघाचे प्रमुख मा. श्री. व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते खालील जिल्हाप्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या :
नाशिक जिल्हाप्रमुख – डॉ. श्री. योगेश दुर्गेश सोनवणी.
छत्रपती संभाजीनगर जिल्हाप्रमुख – श्री. बाळासाहेब चंद्रभान बागल.
पिंपरी चिंचवड महानगर जिल्हाप्रमुख – श्री. रवींद्र लहानू तळपाडे.
या तिन्ही नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना मा. श्री. व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. याबाबत माहिती देताना लोकाधिकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. हनुमंतराव शेळके यांनी अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन पुढील मान्यवरांनी केले:
महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शंकरराव शेळके, हनुमंतराव शेळके, मराठवाडा विभाग प्रमुख सुरेंद्रभाई अक्कनगिरे, प्रदेश कोषाध्यक्ष डॉ. राम गजधने, प्रदेश कार्यकारिणी सदस्य दयानंद चव्हाण आणि शिवदास बुलबुले.
लोकाधिकार संघाचे कार्य राज्यभरात विस्तारत असून, या नव्या नियुक्त्या संघाच्या संघटनात्मक बळकटीस हातभार लावणाऱ्या ठरणार आहेत.
