एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

उद्याच्या आरोग्यासाठी प्रिव्हेंटिव्ह पावरहाऊस

शासकीय व कॉर्पोरेट क्षेत्रासाठी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपचे प्रीमियर हब म्हणून उदयास आले एसएमएचआरसी

उद्याच्या आरोग्यासाठी प्रिव्हेंटिव्ह पावरहाऊस

नागपूर, वानाडोंगरी – 1020 खाटांचे शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (एसएमएचआरसी) शासकीय व खाजगी (कॉर्पोरेट) क्षेत्रात प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठी (प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप) एक सर्वोत्तम पर्याय म्हणून फारच कमी वेळात महत्वाचे स्थान मिळवले आहे. लवकर निदान व आरोग्य देखरेख यामध्ये नवीन मापदंड प्रस्थापित करत हे केंद्र आता अग्रगण्य ठरत आहे.
राज्याचा विश्वास – पोलीस व नागरी सेवांसाठी एसएमएचआरसीची निवड
एसएमएचआरसीच्या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप प्रोग्रॅम (पीएचसीपी) ला महाराष्ट्र शासनाकडून एक मोठा प्रकल्प मिळाला होता, ज्यामध्ये नागपूर शहर पोलीस दलातील 7,500 हून अधिक कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यानंतर राज्यभरातील आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकारी देखील त्यांच्या वार्षिक आरोग्य तपासणीसाठी एसएमएचआरसीची निवड करू लागले.
हॉस्पिटलसह शिक्षण संस्था (टिचिंग हॉस्पिटल्स) असल्याने सुरुवातीला काही शंका व्यक्त करण्यात आल्या असल्या तरी, वैयक्तिक काळजी, जलद सेवा व कार्यक्षम प्रणालीमुळे एसएमएचआरसी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरले. या अधिकाऱ्यांच्या सकारात्मक अनुभवामुळे इतर शासकीय विभाग तसेच खासगी कंपन्यांनी देखील या केंद्राची निवड करायला सुरुवात केली.
नवीन शिखरे गाठताना संस्थेसोबत कॉर्पोरेट व शासकीय संस्था जोडल्या जात आहेत
एसएमएचआरसीच्या व्यापक सुविधा व कार्यक्षम व्यवस्थापनामुळे अनेक नामांकित संस्था आता यांच्यासोबत जोडल्या जात आहेत. बहुतांश कॉर्पोरेट रुग्णालये मर्यादित संख्येमध्ये तपासणी प्रकरणे हाताळू शकतात, परंतु एसएमएचआरसी मध्ये मल्टी स्पेशालिटी डिपार्टमेंट, 24×7 डॉक्टरांची उपलब्धता आणि मजबूत प्रशासकीय यंत्रणा असल्यामुळे एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात तपासण्या शक्य होतात.
आज एसएमएचआरसीच्या सेवा घेणाऱ्या प्रमुख संस्थांमध्ये महाराष्ट्र शासन, एमएसईटीसीएल (महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी), एमएसआरडीसी, एचडीएफसी, अदानी पावर, टाटा ग्रुप, मेडीबडी, अशोक लेलँड, एल्स्टोम, टेक महिंद्रा यांसारख्या खाजगी कंपन्यांचा समावेश आहे.
एमएसईटीसीएल सोबत एक्झिक्युटिव्ह वेलनेस प्रोग्रॅम
नवीन भागीदारीअंतर्गत, एमएसईटीसीएल ने त्यांच्या 40 वर्षांवरील कर्मचाऱ्यांसाठी वयोमानानुसार प्रिव्हेंटिव्ह हेल्थ पॅकेजेस (पीएचपी) साठी एसएमएचआरसी सोबत करार केला आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि वर्धा विभागांतील 125 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत या कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे.
हे पॅकेजेस जीवनशैलीशी संबंधित आरोग्यधोके लक्षात घेऊन, संबंधित कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार बनविण्यात आले आहेत.
पीएचपी टीमकडून अखंड सेवा आणि अचूक अंमलबजावणी
ही संपूर्ण मोहीम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपरस्पेशालिटी ब्लॉक येथील स्वतंत्र पीएचपी विभागामार्फत राबवली जात आहे. याचे प्रशासन डॉ. नूरूल अमीन यांच्याकडे असून, सीएमएस डॉ. वसंत गावंडे वएएमएस डॉ. सुधीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. या अनुभवी टीममध्ये खालील सदस्यांचा डॉ. अनिरुद्ध चक्रवर्ती(पीएचपी फिजिशियन),श्री. पवन चापले(फ्लोअर मॅनेजर),श्री. चेतन लांजेवार(नोंदणी व बिलिंग मॅनेजर),श्री. प्रफुल्ल धाबेकर(रेडिओलॉजी मॅनेजर),कु. राखी ठावकार(सीसीएल मॅनेजर),कु. भाग्यश्री पोहाने(ओपीडी मॅनेजर),कु. मनाली(फिजिशियन असिस्टंट),सिस्टर नम्रता(ओपीडी नर्स) यांचा समावेश आहे.
ही टीम तपासणी प्रक्रियेत कोणताही अडथळा न येऊ देता, रुग्णाभिमुख सेवा व वेळेवर प्रक्रिया यांची हमी देते.
प्रशंसेच्या प्रतिक्रिया व भविष्यासाठी दूरदृष्टी
शासकीय व खासगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी एसएमएचआरसीच्या सुटसुटीत तपासणी प्रक्रिया, वेळेवर अपॉइंटमेंट, वैयक्तिक सल्ला व उत्कृष्ट सेवा यांची विशेष स्तुती केली आहे. फॉलोअप व अहवाल देणे यामध्ये अचूकता आणि वेळेचे काटेकोर पालन दिसून आल्याचे नमूद केले आहे.
डॉ. अनुप मरार, संचालक डीएमआयएचईआर(डीयू) ऑफ कॅम्पस यांनी सांगितले, “वैयक्तिक काळजी, वेळेवर तपासणी आणि सखोल समुपदेशन देण्याची हॉस्पिटलची क्षमता याची अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी प्रशंसा केली आहे.”
श्री अमित दास, संचालक – मार्केटिंग आणि ब्रँडिंग, एसएमएचआरसी यांनी सांगितले, “आमची वैद्यकीय व प्रशासकीय टीम विविध उद्योगांमध्ये ऑन-साईट आरोग्य तपासणी सेवा देत आहे. वाढती मागणी ही संस्थेच्या क्षमतेवरील वाढत्या विश्वासाची साक्ष आहे.”
उद्याच्या आरोग्यासाठी प्रिव्हेंटिव्ह पावरहाऊस
बळकट पाया, समर्पित कर्मचारी व नामांकित संस्थांचा पाठिंबा यामुळे एसएमएचआरसी देशपातळीवर प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी एक नवा मानक ठरत आहे. लवकर निदान, आरोग्य संवर्धन व मोठ्या प्रमाणावर सेवा देण्याची क्षमता यामुळे हे केंद्र सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी विश्वासार्ह भागीदार बनत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link