एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

डिजीटल अरेस्टच्या सायबर गुन्ह्यात जेष्ठ नागरिकास ०६ कोटी २९ लाख रुपयांची फसवणुक करणा-या आरोपीला सापळा रचुन पनवेल येथुन घेतले ताब्यात. पुणे पोलिसांची दमदार कामगिरी.

प्रतिनिधी : गोपाळ भालेराव पुणे :पुण्यातील एका जेष्ठ नागरिकस दि.०९/११/२०२४ रोजी ते दि.१९/११/२०२४ रोजी दरम्यान अनोळखी व्हॉट्सअॅप मोबाईल क्रमांकावरुन फोन करुन पोलीस असल्याची बतावणी करून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन फिर्यादीच्या विरोधात मनी लाँड्रींगची केस आहे असे सांगुन चौकशी करण्याच्या बहाण्याने डिजीटल अरेस्ट करुन संगणमताने फौजदारी कट रचून लबाडीच्या इरादयाने फिर्यादीला पैसे पाठवण्यास भाग पाडून फिर्यादीची एकूण ०६,२९,००,०००/- (अक्षरी सहा कोटी ऐकोणतीस लाख रूपये) इतक्या रकमेची आर्थिक फसवणुक केली असल्यामुळे सायबर खालील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता पो.स्टे.गु.र.नं.८१५/२०२४ भा.न्या.सं.क.३१८(४) ३१९ (२).२०४,६१ (२), आयटी अॅक्ट ६६ (डी), ह्या गुन्हया अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपी यांनी गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या बैंक खात्यांवर घेतली असल्याने तपास करताना दि.११/११/२०२४ रोजी २०,००,०००/-रू. रक्कम फिर्यादी यांचे खात्यातुन आरोपीचे बैंक खात्यामध्ये वर्ग झाल्याचे व त्यानंतर आरोपीने त्याचे बँकेत ९० लाख रुपये व २० लाख रुपये रक्कमेची एफ.डी. केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदरचे बैंक खाते हे श्री. घावीर कन्ट्रक्शन, मु. पो. कोकबन, ता. रोहा, जि. रायगड येथील असल्याची व आरोपी हे बांधकाम व्यवसायिक असल्याची माहिती प्राप्त झाली. तेव्हा सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ सदर बँक खात्याचे खातेधारक तुषार हरिश्चंद्र वाजंत्री व त्याचा साथिदार यांचे असल्याची माहिती मिळाल्याने नमुद आरोपी याचा शोध घेण्यासाठी मु.पो. कोकबन, वा रोहा, जि. रायगड परिसरामध्ये शोध घेतला परंतु पोलीस त्याच्या मागावर असल्याची त्यास चाहुल लागल्याने संधीचा फायदा घेवुन ते पळून गेले. त्यानंतर आरोपी तुषार हरिश्चंद्र वाजंत्री वय २८ वर्षे रा.मु.पो. कोकबन ता. रोह जि. रायगड हा पनवेल परिसरामध्ये असल्याची खात्रीशीर बातमी बातमीदारामार्फत मिळाल्याने सायबर पोलीस ठाणे पथकाने क्षणाचा विलंब न करता आरोपी तुषार वाजंत्री याला पनवेल येथील मोर्बे गावातील ऐश्वर्या रिसोर्ट परिसरातुन सायबर पोलीस पथकाने सापळा रचुन शिताफीने पकडले.

दाखल गुन्ह्यात आरोपी तुषार वाजंत्री याला अटक करुन मा. न्यायालयात हजर केले असता त्यांची एकुण ०५ दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या तपासात यातील आरोपींच्या विरुध्द वेगवेगळ्या राज्यात नॅशनल सायबर पोर्टलवर एकुण ०५ तक्रारी असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे पुणे सायबर पोलीसांना संपूर्ण भारतातील ०५ गुन्हे उघडकीस

आणण्यात यश मिळालेले आहे. या आरोपीचा साथिदार फरार असुन त्याचा सायबर पोलीस ठाणे, पुणे तपास पथक कसोशीने शोध घेत आहे. सदर आरोपीतांचा केरळ पोलीस देखील कसोशीने शोध घेत असताना केरळ पोलीस व सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर हे एकमेकांचे संपर्कात राहुन आरोपीची माहिती गोळा करून शोध घेत होते.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पुणे शहर श्री. पंकज देशमुख मा. पोलीस उप-आयुक्त आर्थिक व सायबर पुणे शहर, श्री. विवेक मासाळ मा. सहाय्यक पोलीस आयुक्त आर्थिक व सायबर पुणे श्री. मच्छिंद्र खाडे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्रीमती स्वप्नाली शिंदे व पोलीस अंमलदार राजुदास चव्हाण, मुंढे, कोंडे, बाळासो चव्हाण, जानवी भडेकर, संदिप पवार, संदिप यादव, सचिन शिंदे, सतिश मांढरे, यांनी सदरची कामगिरी केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link