तारीख: २९ मे २०२५
मौजे पाईट (रौंधळवाडी), तालुका खेड, जिल्हा पुणे
विज कोसळून युवकाचा मृत्यू – आमदार बाबाजी काळे यांच्या प्रयत्नातून तात्काळ आर्थिक मदत
प्रतिनिधी गोपाळ भालेराव
२६ मे २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता मौजे पाईट (रौंधळवाडी) येथे मासेमारीसाठी गेलेल्या श्री. संतोष गुलाब खांडवे यांचा विज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यानंतर ही दु:खद घटना घडली.
श्री. खांडवे हे अत्यंत गरिब कुटुंबातील होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर मोठा आर्थिक भार पडला आहे.
सन्माननीय आमदार श्री बाबाजी रामचंद्र काळे यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत,आपत्कालीन आर्थिक सहाय्यता निधीतून ₹४,००,०००/- (चार लाख रुपये) मदत मिळवून दिली. हा निधी कै. खांडवे यांच्या पत्नीच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यात आला.
खेडचे तहसीलदार श्री. प्रशांत बेडसे यांच्या उपस्थितीत सन्माननीय आमदार श्री बाबाजी काळे यांच्या हस्ते मदतनिधी वितरित करण्यात आला.
