अशोक रसाळ यांच्या बालाघाट मंडळामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी
मांजरसुंबा प्रतिनिधी विवेक कूचेकर
30 मे रोजी बीड बालाघाट मंडळ आयोजित मंडळाध्यक्ष अशोक रसाळ यांनी स्वच्छता मोहीम अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन व शिवमंदिर येथे आरती करून अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती उत्साहात साजरी केली,अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक मंदिराचा जिर्णोद्धार केला शिव मंदिरे उभारली त्यांचे पुनः निर्माण केले अनेक शिव मंदिरांचा जीर्णोद्धार केला हे योगदान कधीही न विसरण्यासारखे आहे अहिल्यादेवी होळकर यांच्या स्त्रीशताब्दी जन्मोत्सवानिमित्त बालाघाट मंडळातर्फे निसर्गाच्या सानिध्यात असलेले श्री क्षेत्र कपिलधार येथे मन्मथ स्वामी यांच्या समाधीने पवित्र असलेले अनेक राज्यांमध्ये या देवस्थानचे नावलौकिक आहे आज येथेच भारतीय जनता पार्टी तर्फे स्वच्छता मोहीम शिव आरती व अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला यानिमित्त यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष शंकर भाऊ देशमुख भाजप संघटन सरचिटणीस नागरगोजे सर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक बालाघाट मंडळाचे अध्यक्ष अशोक रसाळ यांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले होते यावेळी देवस्थानचे पुजारी डॉ. प्रशांत स्वामी,भाजपा अनुसूचित मोर्चाचे बीड तालुका अध्यक्ष पवन कुचेकर, अल्पसंख्यांक मोर्चाचे बीड तालुका अध्यक्ष सलीम जहागिरदार, युवा नेते आप्पासाहेब झोडगे,चौसाळा सर्कल प्रमुख बप्पासाहेब हावळे, विनोदराव काळासे, उदंड वडगाव ग्रा. प.सदस्य नवनाथ चव्हाण, तांदळवाडी चे बुथ प्रमुख नामदेव आबा खोसे, मांजरसुंबा प्रमुख दत्ता रसाळ, पवन कोकाटे, तुषार लाड, अनुरथ कोकाटे, ओमकार रसाळ, दत्ता वाघेरे गणेश, वाघिरे दीपक, वाघिरे ओंकार रसाळ, पवन रसाळ, रितेश सुरवसे, गणेश थोरबोले, वसंत रसाळ, व इतर अनेक जण या कार्यक्रमात सहभागी झाले व उत्साहाने मंदिरामध्ये स्वच्छता करण्यात आली त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून शिव मंदिरात महाआरती करण्यात आली
यावेळी आयोजक मंडळ अध्यक्ष अशोक रसाळ यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले बालाघाटावरील यावेळी अनेक तरुण व ज्येष्ठ सहभागी झाले होते
