सातारच्या नूतन पोलीस अधीक्षकांचे तरुण भारत च्या टीमकडून स्वागत
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आपल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यामध्ये गंभीर गुन्ह्यांचा छडा लावून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, त्यांच्या बदलीनंतर पुणे लोहमार्गाचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते, मागील आठ दिवसांपूर्वी सातारा पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, पहिल्याच दिवशी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता, नवनियुक्त पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी अधीक्षक पदाचा पदभार स्विकारल्यानंतर तरुण भारत च्या सर्व टीमने त्यांची सदिंच्छा भेट घेवून त्यांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या, यावेळी तरुण भारतचे आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर, जहिरात विभाग प्रमुख संजय जाधव, वरिष्ठ पत्रकार विशाल कदम (आण्णा), क्राईम रिपोर्टर गौरी आवळे, फोटोग्राफर तबरेज बागवान (भाई) उपस्थित होते.
यावेळी तरुण भारत च्या टीमने पोलीस अधीक्षकांशी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत तसेच विविध विषयावर चर्चा झाली. त्याच्या बोलण्यातून पोलीस खात्यातील कामाचा अनुभव चांगलाच दिसून येत होता. सगळ्यांना समजून घेत काम करणार असल्याचे सांगत, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
