एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

वडाळा महादेव येथील, विकी गायकवाड यांना, तिरंगा फेमस अभिनेता दिपक शिर्के सोबत भूमिका करण्याची संधी मिळाली

वडाळा महादेव येथील, विकी गायकवाड यांना, तिरंगा फेमस अभिनेता दिपक शिर्के सोबत भूमिका करण्याची संधी मिळाली

शेवगाव प्रतिनिधी-पांडुरंग गोरे

लवकरच बहुतर्चित देशभक्ती वरती आधारित असलेला खाकी लय भारी या मराठी चित्रपटासाठी नागेश फिल्म प्रोडक्शन व जगदंबा मूव्ही प्रस्तुत मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने टायगर पांडे यांचे ऑपरेशन शिंदूर… देश का नया जुनून… खाकी लय भारी या या टॅग लाईन खाली…मराठी चित्रपट तैय्यार होत आहे, चित्रपटांमध्ये अहिल्या नगर जिल्हा, वडाळा महादेव येथील सुपुत्र विकी वामन गायकवाड यांना मेजर सूर्यकांत देव या देशभक्त आर्मी ची भूमिकेसाठी नुकतीच निवड झाली आहे , विकी गायकवाड हे सामान्य कुटुंबातून असून ते साई सूर्य नेत्र सेवा अहिल्यानगर येथे जॉब करीत आहे , कॉलेजमध्ये असताना एक्टिंग डान्सिंग ची खूप आवड होती, व मराठी चित्रपटांमध्ये भूमिका करण्याची त्यांची खूप दिवसाची आवड छंद पाहता… त्यांना भूमिका योगा, योगने मिळाली आहे . अभिनेता विकी वामन गायकवाड हे प्रथमच मोठ्या रुपेरी पडद्यावर दिग्दर्शक लेखक पांडुरंग गोरे यांच्या दिग्दर्शनाखाली तैय्यार होत आसलेला मराठी चित्रपट खाकी लय भारी या मराठी चित्रपटा मध्ये मेजर सूर्यकांत देव इंडियन आर्मी या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. वडाळा महादेव या गावातील लोकांमध्ये या बातमीमुळे उत्साह असून अभिनेता विकी गायकवाड यांना शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.विकी गायकवाड यांचे मेहेनत प्रवास सुरु असून भविष्यात ते अनेक मराठी चित्रपटात पाहिला मिळणार आहे, अशी माहिती खाकी लय भारी चे दिग्दर्शक पांडुरंग गोरे उर्फ टायगर पांडे यांनी दिली आहे. दिग्दर्शक – टायगर पांडे हे देशभक्ती वरती चित्रपट करत आहे… खाकी लय भारी मराठी चित्रपट चालू होत आहे… त्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे, या निवडीचे मराठी हिंदीफिल्म इंडस्ट्री मधून स्वांगत होत आहे. व या गुणी कलाकारांचे अभिनंदन होत आहे. विकी गायकवाड यांनी टायगर पांडे यांचे आभार व्यक्त करत आमच्या प्रतिनिधी बोलताना सांगितले आहे की, आम्ही या संधीचे नक्की सोने करू , या चित्रपटामध्ये तिरंगा फिल्मचे खलनायक , प्रलय नाथ, म्हणजेचं… दीपक शिर्के यांची खाकी लय भारी मध्ये मुख्य खलनायकची भूमिका आहे , हा मराठी चित्रपट 15 ऑगस्ट पासून शूटिंगला सुरुवात होणार आहे व दिवाळी मध्ये रिलीज होणार आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link