वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण:- अखेर रूपाली चाकणकरांची मुख्यमंत्र्यांकडे धाव:- म्हणाल्या दोषरोपपत्र दाखल करण्यास पुणे ग्रामीण पोलिसांची दिरंगाई
वैष्णवी हगवणे आत्महत्यानंतर :- अखेर रूपाली चाकणकरांची मुख्यमंत्र्यांकडे धाव :- म्हणाल्या दोषरोपपत्र दाखल करण्यास पुणे ग्रामीण पोलिसांची दिरंगाई
संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी
वैष्णवी शशांक हगवणे प्रकरणामुळे महिला आयोगाच्या भूमिकेबाबत विरोधी पक्षाकडून चांगलीच टीका करण्यात आली होती, त्या अनुषंगाने आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी या प्रकरणाची थेट गृह विभागामार्फत चौकशी करण्यात यावी याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे, या प्रकरणामुळे पोलिसांकडून वेळेत दोषारोपपत्र दाखल झाले नसल्याचे देखील रूपाली चाकणकरांनी नमूद केले आहे, राज्य महिला आयोगाने मयुरी हगवणे प्रकरणात पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, त्यानुसार बुधवारी पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी अहवाल सादर करून पोलीस तपासाची माहिती दिली आहे, आवश्यक पोलीस तपासनंतर महिला अत्याचारासंबंधीच्या या प्रकरणाची गुन्ह्यांची निर्गती 60 दिवसांत होणे अपेक्षित असताना दोषारोपपत्र विहित मुदतीत न्यायालयात सादर करण्यात आले नसल्याचे गंभीर बाब अहवालात निदर्शनास आली आहे, दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेल्या विलंबनाची ग्रह विभागामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेचा सासरकडून हुंड्यासाठी छळ होवुन मयत झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र अस्वस्थ आहे, मयत वैष्णवी आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, वैष्णवीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर हगवणे कुटुंबीयांच्या अत्याचारांच्या घटना समोर आल्या असून मोठी सून मयुरी जगताप-हगवणे हिला होणाऱ्या त्रासासंबंधी राज्य महिला आयोगाकडे मयुरीचा भाऊ मेघराज जगताप आणि आई लता जगताप यांनी 6 नोव्हेंबर 2024 रोजी तक्रार केली होती, आयोगाने तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्वरित दाखल घेवुन 7 नोव्हेंबर 2024 रोजी पौड पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते,
