महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची एरंडोल तालुका , व कासोदा शहर कार्यकारणी जाहीर…!
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे दि.२५ एप्रिल रविवार रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची बैठक घेण्यात आली. त्यात एरंडोल तालुका व कासोदा शहर कार्यकारणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन कार्यकारणी जाहीर करण्यात आली
त्यात एरंडोल तालुका अध्यक्ष पदी नुरुद्दीन मुल्लाजी तर तालुका उपाध्यक्ष घनश्याम पांडे , तालुका संघटक योगेश चौधरी , तालुका कायदेशीर सल्लागार वासुदेव वारे , तालुका संपर्क प्रमुख शैलेश मंत्री , तालुका सदस्य राहूल शिंपी तर कासोदा शहर अध्यक्ष पदी शैलेश पांडे , शहर उपाध्यक्ष गणेश मोरे , शहर संघटक इम्रान शेख यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हेल्मेट व नियुक्ती पत्र देण्यात आले.
त्याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष किशोर रायसाकडा , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने , उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अबरार मिर्झा , खान्देश संपर्क प्रमुख सागर शेलार , आरीफ पेंटर , जैनुल शेख , फयाज आप्पा शेख उपस्थित होते.
