अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सातारा जिल्ह्यात अवैध धंद्यांना थारा नाही, कडक कारवाईचे संकेत :- नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी.
संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.
सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी नुकताच पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेताच जिल्ह्यामध्ये अवैध जुगार आणि इतर गुन्हेगारी कृत्याविरोधात कडक कारवाई करण्याचे संकेत सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत, यावेळी पोलीस अधीक्षक पुढे म्हणाले… की अवैध धंद्यांना थारा देणार नाही तसेच इतर गुन्हेगारी कृत्यविरोधात कडक कारवाई केली जाईल असा सतक इशारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिला आहे, दोनच दिवसांपूर्वी सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांनी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून चक्री जुगार अड्ड्यावर कारवाई केली आहे तसेच विविध धंदे चालवणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल असाही इशारा पोलीस अधीक्षकांनी दिलाय? सातारा शहरांत गुन्हेगारीचा आलेख चांगलाच वाढलेला असून त्यात अवैधरीत्या धंद्यांमुळे तर आणखीन भर टाकली जात आहे, शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी हे अवैध धंदे सुरू असल्याने तेथील नागरिक सुद्धा असुरक्षित आहेत, पण आता जिल्ह्यात नव्याने आलेले पोलीस अधीक्षक तुषार दोशी साहेबांनी पुणे लोहमार्ग या पोलीस अधीक्षक पदावरून पहिल्याच दिवशी तात्काळ पदभार घेवुन सातारा जिल्ह्याचा अभ्यास चांगलाच पाहून घेतला आहे, त्यामुळे नव्या पोलीस अधीक्षकांमुळे इथून पुढे सुद्धा सातारा पोलिसांची अवैध धंदे तसेच गुन्हेगारी कृत्यावर करडी नजर असणार आहे, तसेच जिल्ह्यात चालणाऱ्या अवैध धंद्यांना नक्कीच आळा बसणार आहे, तत्कालीन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनीही जिल्ह्यामध्ये गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात यशस्वी ठरले जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रम राबवून पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला, जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले,
