एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

युनिव्हर्सिटी”मधून एमएस पदवी

राजगुरूनगर तालुक्यातील अनवळे गावचा युवक अलोक वाळुंज याने मिळवली अमेरिकेतील “स्पेस

युनिव्हर्सिटी”मधून एमएस पदवी

प्रतिनिधी: गोपाळ भालेराव

राजगुरूनगर:खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील छोटेसे पण स्वाभिमानी गाव अनवळे येथील युवक अलोक सुभाष वाळुंज याने अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सुप्रसिद्ध स्पेस युनिव्हर्सिटी मधून मास्टर ऑफ सायन्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही पदवी संपादन करून गावाचा तसेच पाईट परिसराचा नावलौकिक वाढवला आहे.

अलोक वाळुंज याच्या कुटुंबाची सामाजिक बांधिलकी ठसठशीत असून, त्यांच्या आईने दहा वर्षे वडिलांनी पाच वर्षे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पद भूषवले आहे. अशा कुटुंबातून आलेल्या अलोकने कठीण परिस्थितीमध्येही हार न मानता स्वतःच्या शिक्षणासाठी पार्ट टाइम नोकरी करून खर्च उचलला. त्याने स्वतःच्या मेहनतीने व जिद्दीने अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी वाटचाल केली.

अमेरिकेत स्थायिक असलेल्या काही भारतीयांनी अलोकच्या प्रगतीला हातभार लावून त्याला योग्य मार्गदर्शन दिले. या सहकार्यामुळे अलोकला जागतिक स्तरावर आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करता आली आणि त्याने आपल्या परिसराचा गौरव वाढवला.

या यशामुळे अनवळे ग्रामस्थांसह पाईटच्या पश्चिम भागात अलोक वाळुंज याचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक होत आहे. त्यांच्या या यशामुळे अनेक युवकांना प्रेरणा मिळणार असून, ग्रामीण भागातूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचता येते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link