केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवसासाठी महाराष्ट्रात. उद्या नांदेडला शंखनाद सभा
नांदेड-( सखाराम कुलकर्णी) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दि.२५,२६ व२७ मे या तीन दिवसासाठी महाराष्ट्र राज्यात दौऱ्यावर येणार आहेत. दि. २५ ला नागपूर दि.२६ ला नांदेड तर दि.२७ ला मुंबई. या तीन दिवसाच्या दौऱ्यात त्यांचे भरगच्च कार्यक्रम होणार असून दि. २६ मे रोजी नांदेडला शंखनाद सभा होणार आहे. या अमित शाह यांच्या दौऱ्यासाठी नांदेड भाजपामय झाले असून त्यांच्या पुढे- पुढे राहण्यास नेत्यांची स्पर्धा सुरू झाल्याचे दिसत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आज दि.२५ मे ला रात्री साडेनऊ वाजता नागपुरात आगमन व मुक्काम. सोमवारी सकाळी नागपुरात विविध कार्यक्रम व काही उद्घाटन करून दुपारी ३-०० वाजता नांदेडला येणार आहेत. आगमनानंतर दुपारी ३-१० वाजता माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे अनावरण करणार. दुपारी ३-३० वाजता विद्युत नगर येथे खासदार अजित गोपछडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन.व नंतर ३-५० वाजता भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक व काही पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश होणार. ५-१५ ला ल एमआयडीसी भागात भाजपा जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन व रात्री ६-३० वाजता नवा मोंढा नांदेड येथे शंखनाद जनसभा करून रात्री मुंबईला जाणार आहेत. मात्र या विविध कार्यक्रमावर पावसाचे सावट आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यासाठी नांदेडात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सह भाजपाचे अर्धे मंत्रिमंडळ येणार आहे. या दौऱ्यानिमित्त नांदेड भाजपामय झाला असून पूर्ण शहरात बॅनर व कट आउट लावण्यात आले आहेत .सध्या पाऊस व जोराचा वारा वाहत असल्यामुळे हे बॅनर पडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. व त्यामुळे नागरिकांचे जीवनही धोक्यात येऊ शकते. सध्या रस्त्याच्या दुभाजकावर लावलेल्या बॅनर मुळे दुचाकी वाहनधारकांना आपला जीव मुठीत ठेवून वाहन चालवावे लागत आहे. अमित शाह यांचा दौऱा यशस्वी संपन्न झाल्याचे श्रेय लाटण्यासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यात चढावोढ सुरु झाली.
नांदेड जिल्ह्यात भाजपाचे दोन खासदार असून पाच आमदार आहेत. काँग्रेस सोडून भाजपात आलेले व खासदार झालेले अशोकराव चव्हाण यांना आपले राजकीय अस्तित्व व वर्चस्व दाखवण्यासाठी हा अमित शाह यांचा दौरा प्रतिष्ठेचा मांनला जात आहे व त्या प्रतिष्ठेसाठी अशोकराव कामाला लागले. तर दुसरे खासदार अजित गोपछडे मीच अशोकराव पेक्षा वरचढ आहे व माझेच भाजपा मध्ये वर्चस्व आहे. हे दाखवण्यासाठी कामाला लागले आहेत. शेवटी अमित शाह यांची हि शंखनाद सभा यशस्वी होण्यासाठी वरून राजावर अवलंबून आहे .हे चित्र आज दिसत आहे.
