उमरररीच्या सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव पारित झाल्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिवाजी जाधव यांचे राजकीय भवितव्य संपुष्टात
नांदेड-( सखाराम कुलकर्णी राजकीय विश्लेषक)
मुखेड तालुक्यातील उमरदरी ग्रामपंचायत सरपंच सौ.कल्पना कांबळे यांचे विरुद्ध नुकताच अविश्वास ठराव पारित होऊन पीठासीन अधिकारी तहसीलदार यांनी सरपंच पदाची सर्व सूत्रे बालाजी चाफेकर जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी (अजित पवार गट) गटाकडे दिल्यामुळे राष्ट्रवादी( शरद पवार) गटाचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव यांचे राजकीय भवितव्य संपुष्टात आले अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
मुखेड तालुक्यातील उमरदरी ग्रामपंचायतच्या २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत चाफेकर व शिवाजी जाधव यांच्या पॅनलने ९ पैकी नऊ जागावर विजय मिळवला होता. व सरपंच पदासाठी शिवाजी जाधव यांच्या गटाच्या सौ.कल्पना कांबळे यांची निवड झाली होती. तर उपसरपंच पद चाफेकर गटाला आले होते. शिवाजीराव जाधव यांच्या गटातील चार सदस्य सात महिन्यापासून गैरहजर होते व त्यांच्या गटाच्या सरपंच सौ कल्पना कांबळे यांच्या विरोधात गावात नाराजी वाढली होती. म्हणून बालाजी चाफेकर गटाने सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव दाखल करून पारित केला होता. शिवाजी जाधव यांचे कडून विकास कामात अडथळे येऊ लागले. आठ कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना शिवाजी जाधव यांच्या मनमानी व आडमुखे कारभारामुळे व टक्केवारीमुळे वापस गेली. त्यामुळे गावातील ग्रामस्थात प्रचंड नाराजी पसरली होती. आता यापुढे शिवाजी जाधव यांच्या सोबत निवडणुकीत राहायचे नाही असा निर्णय उमरदरी ग्रामस्थांनी घेतल्याचे समजते. शिवाजी जाधव यांचे विकास कामाकडे दुर्लक्ष होते. ही बाब उमरदरी गावकऱ्यांच्या लक्षात वारंवार येऊ लागली. म्हणून ग्रामस्थांनी ठरवूनच शिवाजी जाधव गटावर अविश्वास ठराव आणून बालाजी चाफेकर गटावर विश्वास दर्शविला व शिवाजी जाधव यांच्या गटाच्या सरपंच कल्पना कांबळे यांचे विरुद्ध अविश्वास ठराव आणून पारित केला व त्याच वेळी पिठाची अधिकारी असलेले तहसीलदार यांनी बालाजी चाफेकर यांच्या गटाकडे सरपंच पदाची सुत्र दिली. स्वतःच्याच गावात शिवाजी जाधव यांना अविश्वास ठरावाची मानहानी घ्यावी लागली म्हणून या राजकीय घडामोडी नंतर शिवाजी जाधव यांचे राजकीय भवितव्य संपुष्टात आल्याचे दिसत आहे. व बालाजी चाफेकर जिल्हा सरचिटणीस अजित पवार गटाचे वर्चस्व वाढत असून जनता यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे .असे चित्र आज दिसत आहे.
