मिनाक्षीताई देवकते यांना अहिल्यारत्न पुरस्कार जाहीर
सोलापूर येथे रविवारी होणार वितरण
प्रतिनिधी हनुमंत दवंडे
येथील बाणाई महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष मीनाक्षीताई देवकते / डोमाळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ए. डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला असून रविवार दिनांक 25 मे 2025 रोजी सोलापूर येथील निर्मिती लॉन्स नडगिरी पेट्रोल पंपा समोर विजापूर रोड येथे सदरील पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रकाश शेंडगे हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे, मुंबईचे आयकर आयुक्त डॉ. सचिन मोटे यांच्यासह संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. चिमणभाऊ डांगे, धनगर समाजाचे नेते चेतनभाऊ नरोटे, पुणे येथील सहाय्यक पोलीस आयुक्त सौ. रुक्मिणीताई गलांडे, राम मांडूरके यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तरी या सत्कार सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक तथा ए. डी. फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक गोरड यांनी केले आहे.
