आँचल दलाल डूडी यांनी रायगड पोलीस अधीक्षक म्हणून स्वीकारला पदभार..!! तर सोमनाथ घार्गे अहिल्यानगर चे नवे पोलीस अधीक्षक
आँचल दलाल डूडी यांनी रायगड पोलीस अधीक्षक म्हणून स्वीकारला पदभार..!! रायगड जिल्ह्यात प्रथमच महिला अधिकारी..! तर सोमनाथ घार्गे याची अहिल्यानगर ला बदली
संभाजी पुरी गोसावी (रायगड जिल्हा) प्रतिनिधी
राज्यांत गुरुवारी पोलीस दलातील जवळपास 22 पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या धाराशिवाय रायगड जिल्ह्यातील दोन महिला आयपीएस अधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे, दोन लेडी सिंघम अधिकाऱ्यांकडे या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि पोलीस प्रशासनाची जबाबदारी असणार आहे, धाराशिव चे पोलीस अधीक्षक म्हणून रितू खोकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर रायगडचे पोलीस अधीक्षक म्हणून आँचल दलाल डूडी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून मावळते पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे, तर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अहिल्या नगरचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत, आँचल दलाल डूडी यांनी यापूर्वी सातारा सांगली येथे अप्पर पोलीस अधीक्षक असताना दबंग कारवाया, तसेच समादेशक पुणे बल गट क्रमांक- 1 या ठिकाणी त्या कार्यरत होत्या, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची बहीण आणि पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या त्या पत्नी आहेत, त्यांच्या नियुक्तीने रायगड जिल्ह्याला प्रथमच महिला आयपीएस अधिकारी लाभल्या आहेत, शिस्तप्रिय आयपीएस अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते
