अखेर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरार असणाऱ्या सासरा आणि दिराच्या बावधन पोलिसांनी आवळल्या मुसक्या
संभाजी पुरी गोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी
पुण्यातून एक मोठी अपडेट समोर आली आहे अखेर वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणातील फरार असणाऱ्या सासरा राजेंद्र हगवणे आणि दिर सुशील हगवणे या दोघांच्या बावधन पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या आहेत. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने राजकीय सामाजिक आणि राजकीय वातावरण देखील चांगलेच ढवळून निघाले होते. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे हे मुख्य आरोपी असून ते सध्या फरार होते. अखेर सासरा आणि दिराला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील मुळशी तालुक्यांतील भूकूम येथे 16 मे 2025 रोजी वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने गळफास घेवुन आत्महत्या केली होती. ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवीच्या मृत्यूमुळे राज्यभर एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार झाले होते. गेल्या सात दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता अखेर या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. बावधन पोलिसांनी पहाटे कारवाई करत दोघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत. घटनेनंतर दोघेही फरार झाल्याने तसेच गेल्या सात दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असल्याने संताप व्यक्त केला जात होता. दोन्ही आरोपींना शोधण्यासाठी बावधन पोलिसांनी दोन पथके परराज्यात गेली होती. अखेर या दोघांच्याही मुसक्या आवळण्यात बावधन पोलिसांना यश आले आहे. दरम्यान या प्रकरणी वैष्णवी यांची सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे यांना या आधीच अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांनाही पक्षातून अखेर दाखल हकलपट्टी करण्यात आली आहे.
