संभाजी पुरीगोसावी : दहिवडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा आणला उघडकीस पटकावले 25 हजार रुपयांचे बक्षीस:- पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडून सन्मान..! संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. दहिवडी पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी पोलीस ठाणेचा पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील, दहिवडी पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये योगेश सुरेश पवार (वय 28 ) रा. गोंदवले बुद्रुक ता.माण ) हा तरुण 18 मार्च 2025 पासून बेपत्ता झाला असल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाणेत दाखल होती त्यानंतर दहिवडी पोलिसांनी योगेश पवार याचा शोध घेताना सीडीआरचे विश्लेषण करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला पोलिसांनी गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळवून त्याचा खून झाला असल्याचे निष्पन्न झाले, त्यानंतर दहिवडी पोलिसांनी या तपासाला गती देत अखेर संशयित आरोपीपर्यंत दहिवडी पोलिसांना पोहोचता आले, सदर गुन्ह्यातील आरोपींना मुंबई,पुणे,बारामती येथून ताब्यात घेवून त्यांची कसून चौकशी सुरू होती. अखेर आरोपींनी त्याचा खून करून मृतदेह गाडीसह कालव्यात वाहत्या पाण्यात फेकून दिल्याची कबुली दहिवडी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी कालव्यातील वाहत्या पाण्यातून मृतदेह व गुन्ह्यात वापरलेले हत्यारे हस्तगत केली आणि सदर दहिवडी पोलिसांनी योगेश पवार यांच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. दहिवडी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकाऱ्यांसह पोलीस ठाणेकडील कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता. दहिवडी पोलिसांच्या उत्कृंष्ट कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कुडकर यांनी सन्मान करीत विशेष कौतुक केले यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दहिवडी पोलीस ठाणेला रोख रक्कम 2500 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
