राजाभाऊ साळवे….धाड परिसर शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून निवड
प्रतिनिधी रवी बावस्कर
आज धाड परिसर शिक्षक संस्था 315 अध्यक्षाची आज निवड झाली ….तरूण तडफदार उमेदिचे नेते मागासवर्गिय समाजातील सार्वत्रिक नेतृत्व म्हणून राजाभाऊ साळवे ह्यांना ठरल्या प्रमाणे संधी मिळाली.
2023 ते 2028 ह्या पाच
वर्षात प्रत्येक सदस्याला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. ह्या अटीवर सर्वांनी एकजूट करून आपली पत संस्था पुढे कशी जाईल त्याचा समन्वय कायम राखत प्रथम अध्यक्ष मा.सुभाष देवकर सर कुशल संघटक ह्यांचे नेतृत्वात स्वतःहून सर्वांना संधी मिळावी त्यात सर्व जाती धर्माचे लोक आहेत…मोठा विचार “कर भला सोच भला ” असे बहुजन…बहुआयामी व्यक्तीमत्व मिळाले…सर्वांना समान न्याय मिळावा म्हणून त्यांनी पुढाकार घेतला…त्यामुळे आत्माराम गायकवाड, आणि आता राजाभाऊ साळवे ह्यांना संधी मिळाली. व समोर निवडणून आलेल्या संधी मिळेल….
दिलेला शब्द मोडू नये व लिहिलेला शब्द खोडू नये ह्या वचनाप्रमाणे संपूर्ण संचालक जागत आहेत. त्यामुळे संस्था प्रचंड पाठबळ घेऊन भरारी घेत आहे…
एक कोटीच्या वर बचती आज संस्थेच्या नावावर आहेत….असाच चढता आलेख संस्थेचा राहावा अशी अपेक्षा माजी अध्यक्ष व सदस्यांनी व्यक्त केली. संस्थेचे सदस्य राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ बुलढाणा चे राजू जाधव उमाळी केंद्र प्रमुख हे सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सहकाराचे उदाहरण देताना ” मिलाके साथ चलाचल तेरा भला होगा…
बढा के हात चला चल
तेरा भला होगा…” ह्या उक्तीचा परिणाम सहकारी क्षेत्रात सातत्याने जेथे आहे तेथे प्रगती आहे…अन्य् ठिकाणी सहकाराचा स्वाहाकार झाला तेथे संस्था रसातळाला गेल्यात त्याचे दाखले दिले. असं आपल्या संस्थेत होऊ नये ह्याची खबरदारी घ्यावी. आज राजा भाऊ ह्यांचे डोक्यावर काटेरी मुकुट आहे. जबाबदारी वाढली आहे. ती समर्थपणे ते पेलतील अशी अपेक्षा व्यक्त केली…संस्था सर्वोच्च शिखरावर नेऊन आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतील म्हणून सदिच्छा दिल्यात….
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हा उपनिबंधक ह्यांनी बोलताना संस्था का बुडतात त्याचे उदाहरण देताना थकित कर्जदार ह्यांना नोटीस गेल्यावर राजकारणाला सुरुवात होते. व संस्था डबघाईस येते तसे होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी . हा आपल्या सौख्य सौजन्याचा प्रश्न आहे. सहकारातच प्रगती आहे. ते जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष धडाडीचे गटशिक्षणाधिकारी मा.पंढरी मोरे साहेब ह्यांनी सहकारी संस्थानी केवळ आर्थिक मदत, आर्थिक चनचन लक्षात न घेता शिक्षकांच्या भावनिक प्रश्नांची जाण ठेवावी. सारेच प्रश्न हे आर्थिक स्तरावर नसतात. त्या वर सुद्धा काही प्रश्न कौटुंबिक, कुणाचे दुःखणे…पोरंबाळाची शिक्षण ह्यांवर सुद्धा लक्ष केंद्रित केले पाहिजे…तेच सहकार्य आहे. एकमेकांना मदत करून खरंच सहकाराचा आनंद घ्या…असे मत व्यक्त केले.
ह्यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष आत्माराम गायकवाड ह्यांनी प्रासंगिक वर्षंभराचा अहवाल सादर केला. पुढील कार्यास सदिच्छा दिल्यात. ह्या वेळी मंचावर माजी शिक्षण विस्तार अधिकारी मा. मनोहर मोरे, माजी अध्यक्ष बी .टी .पवार,माजी अध्यक्ष सुभाष देवकर, आत्माराम गायकवाड, सर्व शिक्षक पतसंस्थेचे संचालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.रमेश यंगड सर केंद्र प्रमुख धामणगाव ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन मेहुणकर सर ह्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे सचिव बाळाभाऊ सोनुने, सिध्दू टेकाळे, मोहनसिंग गोलाईत राजाभाऊ साळवे ह्यांचा मित्रपरीवार ह्यांनी परिश्रम घेतले…..
