राज्यभरातील दिव्यांगाना स्वाभिमानाने आत्मनिर्भरतेने जगण्यासाठी मधु तारा.कृषी गौरव.
संपादकीय
दिनांक 19 मे 2025 रोजी राज्यभरातील दिव्यांगाना रोजगार व स्वयंरोजगार देऊन आत्मनिर्भर बनवणारी वाघोली पुणे येथील कृषी गौरव फाऊंडेशनला मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री नितीनजी शिंदे यांनी भेट दिली.
या वेळी संस्थेचे प्रमुख श्री प्रताप सर व राजश्री मॅडम यांनी मधु तारा प्रमुखांचे स्वागत केले.
या वेळी मधु ताराच्या वतीने मोफत सपोर्ट केलीपर बेल्ट बसवून देण्यात आलेल्या लोणी प्रवरानगर जिल्हा अहिल्या नगर येथील शुभांगी गोसावी व मधु तारा यांच्या माध्यमातून आलेल्या पुण्यातील ज्योती बाराते यांना कृषी गौरव फाऊंडेशन मध्ये टेली कॉलिंगचे जॉब देण्यात आले.
या वेळी राजश्री मॅडम आणि प्रताप सरांनी मधु ताराचे आभार व्यक्त करत राज्यभर दिव्यांगांसाठी सोबत राहून कार्य करू असे म्हटले.
