२५ मे ला बुलडाण्यात बौद्ध वधू-वर परिचय मेळावा
प्रतिनिधी -सारंग महाजन.
चिखली :- यश सिद्धी सैनिक सेवा संघ,च्या माध्यमातून महार सैनिकांना पहिल्यांदा राज्य स्तरावर एकत्रित करून यश सिद्धी सैनिक सेवा संघ हे एकमेव संघटन 12 महिने 24*7 अविरत कार्यरत आहे, विविध उपक्रम, कार्यक्रम राबवून समाजहीत साधण्याचा प्रयत्न करत आहे, यश सिद्धी सैनिक सेवा संघा ला पूरक, युवकांना जागृत आणि सक्रिय करण्यासाठी युवा भीम क्रांती, या युवकांच्या संघटनेची बांधणी केली आहे, शिवाय महिला सक्षमी करणा साठी रमाई च्या लेकीं हा ग्रुप कार्यरत आहे, सैनिक पाल्यांच मंगल होण्याच्या उद्दात हेतूने, 2022 ला सैनिक पाल्य या मंगल परिणय ग्रुप व ऋणानुबंध बौद्ध सोयरीक ग्रुप ची स्थापना केल्या गेली या ग्रुप च्या माध्यमातून आतापर्यंत अप्रत्येक्ष, परस्पर अनेक सोयरीकी नाते संबंध, विवाह जोडल्या गेलेत, त्या अनुषंगाने ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली, यश सिद्धी सैनिक सेवा संघ व रमाईच्या लेकी या ग्रुप च्या संयुक्त विद्यमाने स्मृतिशेष रंगनाथ पिराजी डोंगरदिवे बाबा यांच्या जयंती निमित्त रविवार दि. 25 मे 2025 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह, सामाजिक न्याय भवन, त्रिसरण चौक, बुलडाणा जिल्हा बुलडाणा येथे दुपारी 11:30 ते 04:30 वाजेपर्यंत भव्य बौद्ध वधू वर परिचय मेळावा आयोजित केला आहे, या मेळाव्यात विविध क्षेत्रात कार्य करणारे मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तरी जास्तीत जास्त बौद्ध वधू वरांचा परिचय होऊन नाते सबंध जुळतील, तरी या सुवर्ण संधी चा लाभ घ्यावा व इतर आपल्या संपर्कातील संबंधित गरजूना याची माहिती द्यावी ही विनंती अधिक माहिती करिता मुख्य आयोजक ऋणानुबंध विवाह मंडळ,यश सिद्धी सैनिक सेवा संघ, रमाई च्या लेकीं समूह च्या 8855850378 व 9689331853 येथे संपर्क साधावा असे आवाहन ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली,च्या वतीने करण्यात आले आहे.
