चैतन्य भाषा प्रसार व प्रचार मंडळातर्फे दहावी मध्ये बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार वत्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या सरकारी योजनांची माहिती मराठीतून देण्यात आली.
प्रतिनिधी गणेश तारू पुणे
हनुमान नगर केळेवाडी पुणे येथे चैतन्य भाषा प्रसार मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष सौ अनिता बल्लाळ जोशी यांनी पहिली ते दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना मराठी संतांची पुस्तके क्रांतिकारकांची पुस्तके देशभक्तांची पुस्तके भेट म्हणून दिली तसेच त्याच भागातील महिलांना महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजनांची माहिती मराठीतून समजावून सांगितली यासाठी हनुमान नगर येथील अनेक महिला मुली उपस्थित होत्या बारावी मध्ये अत्यंत चांगल्या गुणांनी प्राविण्य मिळालेला कुमार.आदित दीपक पत्की याचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला कुमुदिनी बिल्ला. सौ संध्या ताई बेनकर याही उपस्थित होत्या
