पुणे शहरांत वाढत असलेल्या ड्रुग्स व अंम्बली पदार्थाच्या वापरा संदर्भात पोलीस आयुक्त पुणे यांना मनसे. विध्यार्थी सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
पुणे :आज दिनांक 19 मे 2025 रोजी मनसे विध्यार्थी सेनेच्या वतीने मा. अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर यांना निवेदन देण्यात आले.
पुणे शहराला विद्येचे माहेर घर म्हणुन संपर्ण विश्वभरात ओळखले जाते. त्याच पुण्यात आज शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी ड्रग्ज आणि आम्ली पदार्थाना बळी पडताना दिसून येत आहेत. अशापद्धतीने शिक्षण क्षेत्रात गैरप्रकार घडणे ही मनाला वेदना देणारी बाब आहे यासंदर्भात वेळोवेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून प्रशासनाला सूचित करण्यात आले पुणे शहरातील शाळा व महाविद्यालयांमधील युवक मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या आहारी जाताना आढळत आहेत. आज अनेक विद्यार्थी परराज्यातून पुण्यामध्ये शिकायला येत आहेत, त्यांचे पालक विविध आशा अपेक्षाने व आयुष्यभराची सर्व कमाई खर्च करून त्यांना शिक्षणासाठी पाठवत असतात. त्यामुळे या सर्व गोष्टींचा योग्य वापर होऊन विद्यार्थ्यांचे चांगल्या मार्गाने शिक्षण पुर्ण होणे गरजेचे आहे.
तरी शासनाच्या माध्यमातून युवकांमध्ये वाढत चाललेली ड्रग्ज व आम्ली पदार्थाची क्रेझ कमी करण्यासाठी मोठ्या स्तरावर ड्रग्ज व आम्नी पदार्थ मुक्ति शिवीरे व विद्यार्थ्यांचे प्रयोधन होईल असे विविध सामाजिक उपक्रम राववावे आपल्या माध्यमातून संपुर्ण पुणे शहरामध्ये ड्रग्ज आणि अमली पदार्थ विक्रीला आळा घालावा व हे पदार्थ सहजरित्या महाविद्यालयांमध्येउपलब्ध करून देणा-या लोकांवर कठोर कारवाई करावी पोलिस प्रशासनास ही लोकं शोधण्यास अडचण येत असेल तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अशी लोकं शोधून आपल्या निदर्शनास आणून देऊ शकतो.अशी ग्वाही मनसे विध्यार्थी सेनेचे पुणे शहरअध्यक्ष श्री.महेश भोईवार यांनी निवेदनात म्हटले आहे.
