वडजी गाव ग्रामपंचायत सरपंच यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल” लोकमत सरपंच अवॉर्ड” ने सन्मानित.
प्रतिनिधी- सारंग महाजन.
वाशिम जिल्हा रिसोड तालुक्यातील वडजी येथील उच्चशिक्षित( पी .एच .डी.) कर्तव्यदक्ष ,मेहनती, संधीचे सोनं करणारा माणूस म्हणून ओळखला जाणारा रिसोडच्या राजकीय वर्तुळात “The white Tiger ” या नवीन नावाने ओळख निर्माण करणारे सरपंच शत्रुघ्न बाजड यांनी सामाजिक बांधिलकी जपत गावातील सर्वांच्या सहकार्याने करत असलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लोकमतने वडजी ग्रामपंचायतला जिल्हास्तरीय “लोकमत सरपंच अवार्ड” ने सन्मानित करण्यात आले. वडजी ग्रामपंचायतचे सरपंच शत्रुघ्न बाजड यांना पुरस्कार प्रदान करून सत्कार व सन्मानित करण्यात आले .
पुरस्कार सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार, जिल्ह्यातील सरपंच, सदस्य, सचिव व काही कर्मचारी उपस्थित होते. पुरस्कार प्रदान होताच सर्वांनी टाळ्या वाजवून शुभेच्छा दिल्या. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व मित्रमंडळी नातेवाईकांकडून तसेच सर्व स्तरातून सरपंच शत्रुघ्न बाजड त्यांच्यावर कर्तुकांचा वर्षा होत आहे. पुरस्काराचे सर्व श्रेय वडजी गावकरी मंडळींना दिले आहे.
